माझी पर्सनॅलिटी नव्हती म्हणून प्रियांका चोप्राने किस करण्यास नकार दिला; इतक्या वर्षांनी अन्नू कपूर यांनी सोडले मौन
अन्नू कपूर यांनी '७ खून माफ' चित्रपटातील प्रियांका चोप्रासोबतच्या किसिंग सीनबाबतचा वादाबाबत अखेर मौन सोडलं आहे. प्रियांकाने नकार दिल्यावर त्यांनी अन्नू कपूर यांना एक अभिनेता म्हणून ते आवडलं नसल्याचेही त्यांनी सांगितलं.
ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाने अनेक हीट चित्रपट दिले. पण काही वेळेला चित्रपटाच्या शुटींगवेळी अशा काही गोष्टी घडतात की त्या क्षणाला ती परिस्थिती टाळता येत नाही आणि मनाला बोचतही राहते. असाच किस्सा अन्नू कपूर यांच्यासोबत घडल्याचे त्यांना सांगितलेल्या एका प्रसंगावरून दिसून आले.
इंटिमेट सीनवर स्पष्ट मत मांडलं
अभिनेते अन्नू कपूर हे कायमच स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जातात. अनेकदा त्यांना चित्रपटांबद्दल, अभिनेत्यांबद्दल तसेच अभिनेत्रींबद्दलही बऱ्याच गोष्टी उघडपणे बोललेल्या आहेत. अनेकदा त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आलं. आता पुन्हा एकदा अन्नू कपूर यांनी सांगितलेले काही किस्से हे चर्चेचा विषय ठरले आहेत.
अन्नू कपूर यांनी चित्रपटातील इंटिमेट सीनवर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ते म्हणाले की, “इंटिमेट सीन करताना मी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो जेणे करून त्यांना जास्त संकोचित वाटू नये. यादरम्यान त्यांनी किसिंग सीनवरुन प्रियांकासह झालेल्या वादाबद्दलही सांगितलं.
‘7 खून माफ’ वेळी प्रियांकासोबत किसिंग सीनवरून वाद
‘7 खून माफ’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांना किस देण्यास नकार दिल्याची चर्चा रंगली होती. यावर अन्नू कपूर यांनी जे विधान केलं होतं, त्यावरुन प्रियांकाही नाराज झाली होती. तसेच तिने नकार दिल्यामुळे अन्नू कपूर यांनाही फार राग आला होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा अन्नू कपूर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ते म्हाणाले की “सात खून माफ चित्रपटात अनेक इंटिमेट सीन होते. विशाल भारद्वाज यांनी मला सांगितलं की,प्रियांका थोडी लाजत आहे. उत्सव चित्रपटात तर मी रेखाची मालिश केली आहे. जेव्हा मी जुगार खेळून पळतो तेव्हा तर न्यूड सीनही दिले होते. आर के स्टुडिओत ते शूट झालं होतं”.
पुढे ते म्हाणाले की, “मी विशालला सांगितलं की, जर तिला ठीक वाटत नसेल तर सीनच काढून टाक. त्यावर विशालने असं शक्य नाही सांगितलं. मी ठीक आहे म्हटलं. मी सेटवर मजामस्ती करणाऱ्यातला नाही. मी थोडा गंभीर आहे” असं म्हणत त्यांनी त्यांचा सेटवरचा वावर सांगितला.
प्रियांकासोबतच्या वादावर अखेर मौन सोडलं
अन्नू कपूर यांनी पुढे तो किस्सा सांगितला, “प्रियांका चोप्राने मला किस करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे, पण त्यावरुन फार गदारोळ झाला होता. ती काय म्हणाली मला माहिती नव्हतं. पण मी म्हटलं, जर मी हिरो असतो तर प्रियांका चोप्राला काही आक्षेप नसता. हिरोला किस करण्यावर कोणत्याच अभिनेत्रीला आक्षेप नसतो. हिरो मी आहे, पण मला ना चेहरा, ना पर्सनॅलिटी. त्यामुळे ती समस्या आली असावी. हीच गोष्ट तिच्या मनाला लागली,” असा खुलासा अन्नू कपूर यांनी केला.
दरम्यान प्रियांका आणि त्यांच्यातील वादावर आणि त्या वादाच्या कारणांवर पहिल्यांदाच अभिनेते अन्नू कपूर स्पष्ट बोलले. इतक्या वर्षांनी त्यांनी या वादाबद्दल बोलत मौन सोडलं.