सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील दुसरा व्हिडीओ पुढे, हल्लेखोरांनी थेट..
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात करण्यात आलाय. आता या घटनेचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये हल्लेखोर देखील दिसत आहेत.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी गोळीबार झाला. पहाटे 4.55 ला हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मोठी खळबळ ही बघायला मिळाली. हेच नाही तर एक गोळी सलमान खान याच्या घरामध्ये गेली. या घटनेनंतर चाहत्यांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर एक नाव तूफान चर्चेत आले ते नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याचे. लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसतोय.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर हे स्पष्ट दिसत होते. आता याच गोळीबाराचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अगोदरच्या व्हिडीओपेक्षा हा व्हिडीओ अधिक स्पष्ट दिसतोय, यामध्ये थेट हल्लेखोर हे गोळीबार करताना दिसत आहेत.
सध्या जो नवा व्हिडीओ व्हायरल होतोय त्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर हे गोळीबार करताना दिसत आहेत. सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले जात आहेत. हेच नाही तर हल्लेखोरांनी गोळीबारा वेळी जी दुचाकी वापरली ती दुचाकी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आलीये.
हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर ती दुचाकी सोडून दिली. हल्लेखोर हे कधी रिक्षाने प्रवास करताना दिसले ते कधी रेल्वेने. या गोळीबार प्रकरणातील तपासासाठी पोलिसांकडून एकून 20 पथके तयार करण्यात आलीत. हेच नाही तर हल्लेखोरांचे फोटोही व्हायरल करण्यात आली आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर हे मुंबईच्या बाहेर गेल्याचे देखील सांगितले जातंय.
गेल्या काही दिवसांपासून हा गोळीबाराचा प्लॅन सुरू असल्याचे देखील सांगितले जातंय. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली. याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.