The Kashmir Files: ‘भाजप सरकारच्या नाकाखाली काश्मिरी पंडितांचा अपमान’; इफ्फीच्या ज्युरींवर भडकले कलाकार
'द काश्मीर फाइल्स'ला असभ्य म्हणणाऱ्या इफ्फीच्या ज्युरींवर अनुपम खेर यांचा पलटवार
गोवा: गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात मंचावर बोलताना मुख्य ज्युरींनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका केली. हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हे मत मांडलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच कारणामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. नदाव यांच्या या वक्तव्यावर ‘द काश्मीर फाइल्स’मधील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
अनुपम खेर यांचं ट्विट-
‘झूठ का कद कितना भी उंचा क्यों न हो, सत्य के मुकाबले में हमेशा छोटा ही होता है’ (खोटेपणा कितीही मोठा असला तरी सत्याच्या तुलनेत त्याचं महत्त्व कमीच असतं) असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत.
झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो.. सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है.. pic.twitter.com/OfOiFgkKtD
— Anupam Kher (@AnupamPKher) November 28, 2022
दर्शन कुमारने व्यक्त केली नाराजी
“आपण जे काही पाहतो किंवा ऐकतो त्यावर प्रत्येकाचं वेगळं मत असतं. मात्र तुम्ही तथ्याला नाकारू शकत नाही. द काश्मीर फाइल्स हा एक असा चित्रपट आहे जो काश्मिरी पंडितांचं दु:ख दाखवतो. ते आजही दहशतवादाविरोधात लढाई लढत आहेत. हा चित्रपट अश्लीलतेवर नाही तर सत्यावर आधारित आहे”, असं अभिनेता दर्शन कुमारने म्हटलंय.
#Israeli filmmaker #NadavLapid has made a mockery of India’s fight against terrorism by calling #KashmirFiles a vulgar film . He has insulted 7 lac #KashmiriPandits under the nose of the #BJP govt . Its a big blow to #IFFIGoa2022 ‘s credibility. Shame .
— Ashoke Pandit (@ashokepandit) November 28, 2022
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीसुद्धा ज्युरींच्या मतावर प्रतिक्रिया दिली. ‘इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाइल्सला असभ्य म्हणून दहशतवादाविरोधी लढलेल्या भारताच्या लढाईची खिल्ली उडवली आहे. भाजप सरकारच्या नाकाखाली त्यांनी सात लाख काश्मिरी पंडितांचं अपमान केलं आहे. इफ्फीच्या विश्वासार्हतेवर हा खूप मोठा धक्का आहे. लज्जास्पद,’ असं ट्विट त्यांनी केलं.