Anupam Kher | ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांची मोठी प्रतिक्रिया, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराबद्दल मोठे भाष्य

द काश्मीर फाइल्स चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बोलबाला बघायला मिळाला. या चित्रपटाने धमाका केला आहे. चाहत्यांच्या या पुरस्काराकडे नजरा होत्या. शेवटी विजेत्यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आलीये. कंगना राणावत हिला या पुरस्कारामध्ये मोठा झटका हा नक्कीच बसला आहे.

Anupam Kher | 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांची मोठी प्रतिक्रिया, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराबद्दल मोठे भाष्य
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 11:02 PM

मुंबई : द कश्मीर फाइल्स चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) मिळाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बेस्ट चित्रपटाचा नरगिस दत्त हा पुरस्कार मिळाला आहे. मुळात म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाचा दबदबा बघायला मिळाला. या चित्रपटाने अजूनही पुरस्कार मिळवत बाजी मारली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाने मोठा धमाका केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम देखील मिळाले. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तूफान अशी कमाई केली.

द कश्मीर फाइल्स या चित्रपटामध्ये अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुपम खेर आणि चित्रपटाच्या टिमचे काैतुक केले आहे.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त करत एक पोस्ट शेअर केलीये. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, द काश्मीर फाइल्सने प्रतिष्ठित आणि सर्वात महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला याचा आनंद आणि अभिमान नक्कीच आहे. नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार….

आमच्या चित्रपटाला मिळालेली ओळख केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही मला खूप आनंद झाला आहे. मला माझ्या अभिनयासाठी पुरस्कार मिळालेला आवडेल. परंतू नक्कीच सर्वच इच्छा पूर्ण होणे शक्य नसते. जर सर्वच इच्छा पूर्ण झाल्या तर काम करण्यात देखील ती मजा नसते…जाऊद्या…

पुढे अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, सर्व विजेत्यांचे अभिनंदन…या पुरस्कार सोहळ्यात बाॅलिवूड चित्रपटांसोबत साऊथ चित्रपटांचा जलवा हा बघायला मिळाला. विशेष: RRR आणि पुष्पा चित्रपटाचा. आज सकाळपासूनच चाहत्यांच्या नजरा या पुरस्कार सोहळ्याकडे होत्या. शेवटी विजेत्यांच्या नावाची घोषणा आज सायंकाळी करण्यात आली. आलिया भट्ट हिला देखील या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाला आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.