माझ्याबद्दल बरंवाईट म्हणालात तर मी गप्प…; नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या वादावर अनुपम खेर स्पष्टच बोलले..

2020 मध्ये अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात मोठा वाद झाला होता. नसीरुद्दीन यांनी अनुपम यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अनुपम यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिलं होतं. आता चार वर्षांनंतर त्याच वादावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्याबद्दल बरंवाईट म्हणालात तर मी गप्प...; नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या वादावर अनुपम खेर स्पष्टच बोलले..
Naseeruddin Shah and Anupam KherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 9:49 AM

अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह या दोन्ही दिग्गज कलाकारांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र कामसुद्धा केलंय. अनुपम आणि नसीरुद्दीन हे दोघं खऱ्या आयुष्यातही बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपली राजकीय मतं दोघंही मोकळेपणे मांडताना दिसतात. 2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोणची बाजू घेत नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली होती. अनुपम खेर हे ‘विदूषक’ आणि ‘मोठ्या लोकांची खुशामती करणारे’ आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून दोन्ही कलाकारांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले.

अनुपम खेर यांची वादावर प्रतिक्रिया

शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “मी माझे वैयक्तिक संबंध कोणासोबतच बिघडवण्याचे प्रयत्न केले नाहीत. नसीरुद्दीन सर यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. पण जेव्हा नसीरुद्दीन सर माझ्याबद्दल चुकीचं बोलले, तेव्हा मी कसा शांत बसू शकतो? मी भगवद् गीता वाचली आहे. त्यात कृष्ण अर्जुनाला म्हणतात, इथे उभे असलेल्यांपैकी कोणीच तुझे कुटुंबीय नाहीत. जे योग्य आहे ते तुला करावंच लागेल. जेव्हा तुमच्या तत्त्वांचा विषय येतो, तेव्हा समोर कोणीही असलं तरी तुम्हाला सत्य काय ते बोलावंच लागतं. आणि मी अशा लोकांपैकी आहे, जे खरं बोलतात. त्या वादानंतरही आम्ही आमच्या सीएच्या अंत्यविधीला भेटलो होतो. तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती. अर्थात, त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमात तुम्हाला फरक जाणवतो, पण आम्ही अजूनही मित्र आहोत.” “माझ्या रक्तातच ते आहे, असं काहीतरी त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मला त्या वक्तव्यावर उत्तर देणं महत्त्वाचं होतं. पण ते उत्तर मी त्यांचा मान राखूनच दिलं होतं”, असं खेर यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

2020 मध्ये नसीरुद्दीन शाह आणि अनुपख खेर यांच्यातील वादाला सुरुवात झाली होती. त्यावेळी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन म्हणाले, “दीपिकासारख्या मुलीच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल, जी इतकी मोठी सेलिब्रिटी असूनही तिने हे पाऊल उचललं. जरी तिला यामुळे खूप काही गमवावं लागलं, तरी तिने हे पाऊल उचललं. त्यामुळे यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांना ती कशी सामोरं जाते ते पहावं लागेल. अर्थातच, ती काही जाहिरातींचे ऑफर्स गमावून बसेल. पण यामुळे तिची लोकप्रियता कमी होईल का? त्यामुळे ती कमी सुंदर होईल का? त्यामुळे ती गरीब होईल का? ही फिल्म इंडस्ट्री फक्त पैशांच्या देवाची पूजा करते. अनुपम खेर यांच्यासारखे लोक खूप मोकळेपणे व्यक्त होतात. पण त्यांच्या वक्तव्यांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तो जोकर आहे. एनएसडी (NSD) आणि एफटीआयआय (FTII) मधील त्यांचे कितीही समकालीन लोक त्यांच्या गूढ स्वभावाची साक्ष देऊ शकतात. हे त्यांच्या रक्तातच आहे, त्याला तेसुद्धा काही करू शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

नसीरुद्दीन यांना अनुपम खेर यांचं उत्तर

नसीरुद्दीन शाह यांच्या या टीकेवर उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले होते, “मी कधीच तुमच्याबद्दल वाईच बोललो नाही किंवा तुमच्याशी उद्धटपणे वागलो नाही. पण मला आता हे बोलावं लागेल की तुम्ही एवढं यश संपादन करूनही तुमचं सर्व आयुष्य अस्वस्थतेत घालवलंय. जर तुम्ही दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान आणि विराट कोहलीवर टीका करू शकता, तर मी नक्कीच चांगल्या लोकांसोबत आहे. तसंच यापैकी कोणत्याच व्यक्तीने तुमच्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहिलं नाही. कारण आम्हाला माहीत आहे की इतकी वर्षे तुम्ही जे सेवन केलंत, त्यामुळे असं बोलत आहात. म्हणूनच काय योग्य आणि काय अयोग्य यात तुम्हाला फरक समजत नाहीये. जर माझ्याबद्दल वाईट बोलून तुम्ही काही दिवसांमध्ये हेडलाइन्स मिळत असतील, तर माझ्याकडून ही तुम्हाला भेटच समजा.”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.