Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files ला ‘बकवास’ म्हणणाऱ्या प्रकाश राज यांना अनुपम खेर यांच्याकडून सडेतोड उत्तर

त्यांच्या या टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं. त्याच मुद्द्यावर आता 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

The Kashmir Files ला 'बकवास' म्हणणाऱ्या प्रकाश राज यांना अनुपम खेर यांच्याकडून सडेतोड उत्तर
Prakash Raj and Anupam KherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 4:41 PM

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही काम करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर नुकतीच टीका केली. हा प्रचारकी चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीसुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं. त्याच मुद्द्यावर आता ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अनुपम खेर यांचं उत्तर

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “लोक आपापल्या लायकीनुसार बोलतात. काही लोकांना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं. तर काही लोक आयुष्यभर खरं बोलतात. मी त्या लोकांमधला आहे, जे आयुष्यभर खरं बोलतात. ज्यांना खोटं बोलून जगायचं असेल, ती त्यांची मर्जी आहे.”

काय म्हणाले होते प्रकाश राज?

विवेग अग्निहोत्रींच्या या चित्रपटावर टिप्पणी करताना प्रकाश राज म्हणाले होते, “हा अत्यंत बकवास चित्रपट आहे. मात्र आपल्याला माहीत आहे की त्याची निर्मिती कोणी केली… अत्यंत निर्लज्जपणा आहे हा. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुकते आणि दिग्दर्शक अजूनही विचारत आहेत की त्यांना ऑस्कर का नाही मिळत. त्यांना ऑस्कर काय भास्करसुद्धा मिळणार नाही. कारण तिथे संवेदनशील मीडिया आहे आणि इथे तुम्ही प्रचारकी चित्रपट बनवत आहात.”

हे सुद्धा वाचा

अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने भारतात 252 कोटी रुपये आणि जगभरात 341 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. द काश्मीर फाइल्स हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील दुसरा चित्रपट आहे.

इफ्फीचा वाद

गोव्यात पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) अध्यक्ष आणि पुरस्कार विजेते इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. “हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काहीच वाटलं नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे”, असं ते मंचावर सर्वांसमोर म्हणाले होते.

'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले....
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.