माझ्या वडिलांसोबत रुपाली गांगुलीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर; सावत्र मुलीचा ‘अनुपमा’वर धक्कादायक आरोप

'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. ईशा वर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माझ्या वडिलांसोबत रुपाली गांगुलीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर; सावत्र मुलीचा 'अनुपमा'वर धक्कादायक आरोप
रुपाली गांगुली, अश्विन के. वर्मा आणि ईशाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 10:44 AM

अभिनेत्री रुपाली गांगुली ‘अनुपमा’ या मालिकेमुळे सतत चर्चेत असते. टेलिव्हिजनवरील ही सर्वांत लोकप्रिय मालिका असून या मालिकेला चांगला टीआरपी मिळतो. मात्र रुपाली अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. रुपालीला अनेकदा तिचा पती अश्विन के. वर्मासोबत पाहिलं गेलंय. इंडस्ट्रीत लोक त्यांच्या परफेक्ट लग्नाचं कौतुक करतात. मात्र रुपालीवर तिच्या सावत्र मुलीने धक्कादायक आरोप केले होते. रुपालीच्या आधी अश्विन के. वर्माचं सपना वर्माशी लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अश्विनची मुलगी ईशा वर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित रुपालीवर कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला होता.

ईशा वर्माची पोस्ट पुन्हा चर्चेत

‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ईशा वर्माची जुनी पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ईशा ही अश्विन आणि त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. ईशाने चार वर्षांपूर्वीच्या या स्क्रीनशॉटमध्ये रुपाली आणि अश्विनच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. तिने रुपालीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. ईशाने असंही म्हटलं होतं की रुपालीने तिच्या वडिलांना त्यांच्यापासून वेगळं केलंय आणि आता ते एकमेकांशी बोलत नाहीत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Esha Verma (@eshav.official)

काय होती ईशाची पोस्ट?

‘हे खूपच दु:खद आहे. कोणाला रुपाली गांगुलीची खरी कहाणी माहीत आहे का? तिचं 12 वर्षांपर्यंत अश्विन के. वर्मासोबत अफेअर होतं. तेव्हा ती विवाहित होती. ती एक कठोर मनाची महिला आहे आणि तिने मला, माझ्या बहिणीला आमच्या वडिलांपासून दूर केलंय. ते मुंबईत येण्याआधी 13-14 वर्षे न्यूजर्सी आणि कॅलिफोर्नियाला राहायचे. मी हे सगळं यासाठी बोलतेय की कारण ती नेहमी असा दावा करते की तिचं वैवाहिक आयुष्य किती सुंदर आहे. पण खऱ्या आयुष्यात ती वेगळीच आहे. मी जेव्हा कधी माझ्या वडिलांना फोन करायची, तेव्हा ती ओरडायची. इतकंच नव्हे तर तिने मला आणि माझ्या आईला धमक्यासुद्धा दिल्या आहेत’, अशी पोस्ट ईशाने लिहिली होती.

2021 मध्ये ईशा वर्माला तिची सावत्र आई रुपाली गांगुली आणि वडील अश्विन वर्मा यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये पाहिलं गेलं होतं. या तिघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिला होता. रुपालीने इन्स्टाग्रामवरील या फोटोला लाइकसुद्धा केलं होतं.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....