कॅमेरासमोर दिखावा कशाला? पतीच्या पायांना स्पर्श केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना ‘अनुपमा’चं उत्तर

“टेलिव्हिजनवरील तुमचं दमदार अभिनय पाहून जेव्हा लोक तुम्हाला फोन करतात किंवा तुमच्या अभिनयाबद्दल, कामाबद्दल बातम्या लिहिल्या जातात, तेव्हा तो माझा विजय असतो. तेव्हा ते माझं यश असतं. या इंडस्ट्रीत काम करणं सोपं नाही”, असं रुपाली एका मुलाखतीत म्हणाली होती.

कॅमेरासमोर दिखावा कशाला? पतीच्या पायांना स्पर्श केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना 'अनुपमा'चं उत्तर
Rupali GangulyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 9:58 AM

जर तुम्हाला विचारलं की सध्या टेलिव्हिजनवर कोणती मालिका सर्वाधिक चालतेय. तर 50 टक्क्यांपेक्षा जास्त कौटुंबिक मालिकाप्रेमी ‘अनुपमा’चंच नाव घेतील. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. मध्यंतरीच्या काळात यातील काही कलाकारांनी मालिका सोडली. कथेत बराच बदल झाला. इतकंच नव्हे तर मालिकेत लीपसुद्धा आला. तरीसुद्धा त्याचा प्रेक्षकवर्ग कमी झाला नाही. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमाची भूमिका साकारतेय. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे रुपाली आता घराघरात ‘अनुपमा’ या नावानेच ओळखली जातेय. तिचा आणि तिच्या मालिकेचा चाहतावर्ग मोठा असला तरी एक वर्ग असाही आहे, जो ‘अनुपमा’ला ट्रोल करतो. काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरील रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती तिच्या पतीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसतेय. या व्हिडीओवरून अनेकांनी रुपालीला ट्रोल केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी रुपाली गांगुलीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती तिच्या पतीसोबत एअरपोर्टवर होती आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसली होती. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर अनेकांनी रुपालीबद्दल नाराजी व्यक्त केली. मालिकेत महिला सक्षमीकरण, महिलांना समान अधिकार आणि आदर याबद्दल भरभरून बोलणारी रुपाली खऱ्या आयुष्यात मात्र त्याविरुद्ध दिसली, असं अनेकांनी म्हटलं होतं. ‘जर आशीर्वाद घ्यायचाच होता तर घरीच हे करायला पाहिजे होतं. कॅमेरासमोर दिखावा करण्याची काय गरज’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला होता.

रुपाली गांगुलीचं उत्तर-

‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत रुपाली म्हणाली, “माझे पती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे मला तसं काम करण्याची गरज नाही. ते संपूर्ण कुटुंबाची काळजी चांगल्याप्रकारे घेऊ शकतात. मात्र असं असूनही त्यांनी मला नेहमी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माझ्या मते ते आमच्या घराचे ‘मुखिया’ आहेत आणि ते आम्हा सर्वांना सांभाळतात. म्हणूनच मी नेहमी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेते. एखाद्या दिवशी जरी आमचं भांडण झालं, तरी दुसऱ्या दिवशी उठून मी त्यांचा आशीर्वाद घेतेच. यात काहीच कमीपणा वाटून घेण्यासारखं नाही.”

हे सुद्धा वाचा

‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली घराघरात पोहोचली. रुपालीचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक अनिल गांगुली आहेत. वडिलांची प्रकृती ठीक नसताना त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...