थोडं कमी पित जा; पार्टीनंतर ‘अनुपमा’ला अनकम्फर्टेबल पोझमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'अनुपमा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीला टीव्ही इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीनंतरचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘अनुपमा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीने 30 एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला टीव्ही इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया उपस्थित होता. रुपालीच्या बर्थडे पार्टीमधील विविध फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ती उत्साहाने नाचताना दिसतेय. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियासोबत फोटोसाठी पोझ देताना पहायला मिळतेय. तिचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओतील तिची वागणूक पाहून नेटकरी रुपालीला ट्रोल करत आहेत.
रणवीर पापाराझींसमोर उभा असतो, तितक्यात मागून रुपाली येते. यावेळी ती थोडी अडखळतच येते आणि त्यानंतर आपल्या ड्रेसने रणवीरच्या तोंडावरील घाम पुसते. यावेळी रुपाली आणि रणवीर दोघंही अनकम्फर्टेबल पोझमध्ये फोटोसाठी उभे राहतात. तिचा हा वेगळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. टेलिव्हिजनवरील ‘संस्कारी सुने’चं असं वागणं पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘थोडं कमी पीत जा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ती नशेतच दिसतेय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘मद्यपान केल्यानंतर कोणीच शुद्धीवर नसतं’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
30 एप्रिल रोजी वाढदिवसाची जंगी पार्टी केल्यानंतर रुपालीने 1 मे रोजी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात तिने विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी रुपाली म्हणाली, “विकासाचं हे महायज्ञ पाहताना मलाही त्यात सहभागी व्हावंसं वाटलं. मला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरून मी जे काम करेन ते आणखी चांगल्या पद्धतीने आणि योग्य रितीने करू शकेन.”
रुपालीचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक अनिल गांगुली आहेत. वडिलांची प्रकृती ठीक नसताना त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही तिची मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य अनुपमाची भूमिका साकारतेय. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेमुळे रुपाली सर्वसामान्यांमध्येही ‘अनुपमा’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.