TRP साठी मालिकेतून एकाच वेळी 5 कलाकारांचा पत्ता साफ करणार निर्माते?

अनुपमा ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मात्र या मालिकेत येणारा नवीन ट्विस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. टीआरपीसाठी निर्मात्यांनी केलेली खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.

TRP साठी मालिकेतून एकाच वेळी 5 कलाकारांचा पत्ता साफ करणार निर्माते?
AnupamaaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 1:07 PM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या टीआरपीमध्ये सतत घट होताना दिसतेय. त्यातच आता वाहिनीकडून शेअर करण्यात आलेला नवीन प्रोमो पाहून चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अनुपमा ही अमेरिकेला गेल्यानंतर एका कॅफेमध्ये काम करताना दिसतेय. तिथे एका लहान मुलीला पाहून तिला छोट्या अनुची आठवण येते. हे पाहून अनुज आणि छोटी अनु कुठे गेले, अनुपमा अमेरिकेत एकटी काय करतेय, असा प्रश्न चाहत्यांना पडतो. यादरम्यान अशी माहिती समोर येत आहे की मालिकेच्या या नव्या ट्रॅकसाठी एक – दोन नव्हे तर पाच भूमिका कमी करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार छोट्या अनुचं निधन होईल. त्यामुळे तिची भूमिका साकारणारी बालकलाकार अस्मी देओ आता मालिकेत दिसणार नाही. याशिवाय मालिकेत वनराजची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडे गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. नव्या ट्रॅकनुसार वनराज आपली प्रकृती ठीक करण्यासाठी घरापासून दूर मेडिटेशन सेंटरला निघून जाणार आहे. सध्या मालिकेत रोमिलच्या बॉस्टनमधील शिक्षणाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तोसुद्धा मालिकेतून गायब होणार असल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे किंजल शाह आणि तोषू परदेशात स्थायिक होण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये हे दोघंही दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. किंजल शाह आणि तोषूची भूमिका साकारणारे निधी शाह, आशिष मल्होत्रा मालिकेचा निरोप घेतील. तर मालिकेत पुढे बा आणि बापूजी या दोघांना अनुपमा तिच्या घरी म्हणजेच कपाडिया हाऊसमध्ये घेऊन जाणार आहे. यामुळे तिची सासू मालती देवी चांगली चिडली आहे.

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली एका शांत स्वभावाच्या, समजुतदार गृहिणीची भूमिका साकारतेय. कोरोना काळात ही मालिका सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. यादरम्यान मालिकेत काही नवीन कलाकार आले तर काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. स्टार प्लस वाहिनीवरील दुसऱ्या मालिकांकडून ‘अनुपमा’ला तगडी टक्कर मिळतेय. त्यामुळे आगामी काळात या मालिकेचं नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.