Virushka | अनुष्का शर्मा – विराट कोहली देणार गोड बातमी, होणार दुसऱ्यांदा आई – बाबा?

Anushka Sharma Second Pregnancy | अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा? 'त्या' एका गोष्टीमुळे चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... लवकरच विराट - अनुष्का होणार आई बाबा?

Virushka | अनुष्का शर्मा - विराट कोहली देणार गोड बातमी, होणार दुसऱ्यांदा आई - बाबा?
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 1:25 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. विराट आणि अनु्ष्का कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. आता देखील दोघांच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विराट आणि अनु्ष्का दुसऱ्यांदा आई – बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहेत. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. विराट आणि अनु्ष्का लवकरच चाहत्यांसोबत ‘गुडन्यूज’ शेअर करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या याबद्दल दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. पण एका गोष्टीमुळे अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्का यांना पापाराझींनी मॅटरनिटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केलं आहे. पण दोघांनी देखील फोटो लीक करू नका अशी विनंती पापाराझी यांना केली आहे. दोघे देखील आनंदीची बातमी लवकरच चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे दोघे आता कधी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, विराट कोहली आता मिशन वर्ल्डकपसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यात त्याने अर्धशतक करत कमबॅक केलं होतं. वर्ल्ड मध्ये विराट कोहली बॅकबोन असल्यासारखा संघातील खेळाडू आहे. विराटने सलग तीन वर्ल्ड कप खेळले असून त्याचा हा चौथा वर्ल्ड कप असणार आहे. भारतीय चाहत्यांकडून विराटला मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहेत.

विराट – अनुष्का यांनी नाही दाखवला लेकी चेहरा…

विराट – अनुष्का यांनी मुलगी वामिका कोहली यांचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. लेकीसाठी दोघांनी ‘नो फोटो पॉलीसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा पापाराझींनी वामिका हिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्रीने फोटो काढणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. वामिका आता २ वर्षांची आहे. विराट आणि अनुष्का दोघे देखील लेकीसोबत फोटो पोस्ट करत असतात. पण त्यांनी देखील लेकीचा चेहरा दाखवलेला नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.