Amitabh Bachchan- Anushka Sharma | दंड आकारण्यात इतकी तफावत का? अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अनुष्का शर्मा हिला जास्त भुर्दंड कशासाठी, जाणून घ्या कारण
अनुष्का शर्मा ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे. सोशल मीडियावर अनुष्का शर्मा ही सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अनेकांनी अनुष्का शर्मा हिला टार्गेट देखील केले.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही विराट कोहली (Virat Kohli) याला सोडून एका दुसऱ्याच व्यक्ती सोबत मुंबईत गाडीवर फिरताना दिसली. अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण फुटले. अनुष्का शर्मा ज्या व्यक्तीसोबत फिरत होती ती व्यक्ती तिचा बॉडीगार्ड आहे. पूर्ण रस्ता जाम असल्याने अनुष्का शर्मा ही थेट बॉडीगार्डसोबत गाडीवर निघाली. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. मात्र, आता या व्हिडीओमुळे (Video) अनुष्का शर्मा हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.
अनुष्का शर्मा हिचा जो व्हिडीओ व्हायरल होत होता, त्या व्हिडीओमध्ये तिने हेल्मेट घातले नसून तिच्या बॉडीगार्डने देखील हेल्मेट घातले नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट अनुष्का शर्मा हिच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. विशेष म्हणजे या प्रकरणात मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. अनुष्का शर्मा हिला दंड भरावा लागणार आहे.
Challan has been issued u/s 129/194(D) of MV ACT along with fine of Rs 1000 & it is been paid by the offender. https://t.co/vfEsPD3G0T pic.twitter.com/bRcpjuWrNR
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2023
फक्त अनुष्का शर्मा हिचाच नाही तर अमिताभ बच्चन यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे देखील हेल्मेट न घालता मुंबईमध्ये गाडीवर फिरताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांना जो व्यक्ती गाडीवर घेऊन जात आहे, त्याने देखील हेल्मेट घातले नाहीये. मुंबई पोलिसांनी अमिताभ बच्चन यांना देखील दंड लावला आहे.
अनुष्का शर्मा हिला 10,500 दंड तर अमिताभ बच्चन यांना 1000 रूपयांचा दंड लावला आहे. मात्र, अनुष्का शर्मा हिला जास्त आणि अमिताभ बच्चन यांना कमी दंड लावल्याने चर्चा रंगताना दिसत आहे. अनुष्का शर्मा प्रकरणात मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत. ट्विटनुसार, वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र वाहन कायदा कलम 129 /194 (डी), कलम 5/180 आणि कलम 3(1) 181 अंतर्गत कारवाई केली. अनुष्का शर्मा हिला 10,500 रूपयांचा दंड लावला.
Challan has been issued under Sec 129/194(D), Sec 5/180 & Sec 3(1)181 MV act to the driver along with an fine of Rs. 10500 & been paid by the offender. https://t.co/aLp6JEstLO pic.twitter.com/Br0ByHZk4T
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2023
मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटनुसार, अमिताभ बच्चन यांच्या प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र वाहन कायद्याच्या कलम 129/194 (डी) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात, 500 ते 1000 रुपयांचे चलन कापण्याची तरतूद आहे. याशिवाय चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. अनुष्का शर्मा आणि अमिताभ बच्चन या दोघांचे देखील व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. अगोदर अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर अमिता बच्चन यांचा.