Virat Anushka: जोडी असावी तर अशी.. ‘या’ सात भन्नाट फोटोंमधून अनुष्काने व्यक्त केलं ‘विराट’प्रेम

विराटचे 'हे' फोटो तुम्ही पाहिलेच नसतील; लग्नाच्या वाढदिवशी अनुष्काची भन्नाट पोस्ट

Virat Anushka: जोडी असावी तर अशी.. 'या' सात भन्नाट फोटोंमधून अनुष्काने व्यक्त केलं 'विराट'प्रेम
Virat and AnushkaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 1:52 PM

मुंबई: जोडी असावी तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मासारखी.. हे तुम्ही आजवर अनेकांच्या तोंडून ऐकलं असणार. क्रिकेटर विराट आणि अभिनेत्री अनुष्का यांची जोडी केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय आहे. या दोघांच्या लव्ह-स्टोरीपासून ते वामिकाचे आई-बाबा होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांना माहीत असेल. इटलीत पार पडलेला स्वप्नवत लग्नसोहळा आजही अनेकांच्या आठवणीतल्या सुंदर क्षणांपैकी एक आहे. एकमेकांसोबत हे दोघं जितके रोमँटिक दिसतात, तितकेच ते एकमेकांची मस्करीदेखील करतात. आता लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी अनुष्काने खास तिच्या अंदाजात विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिने सोशल मीडियावरील भन्नाट व्हायरल मीम्स आणि तिच्या फोनमधील काही हटके फोटो निवडले आहेत.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सात फोटो पोस्ट केले आहेत. या प्रत्येक फोटोबद्दल तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हे फोटो आणि कॅप्शन वाचून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटेल. ‘आपलं प्रेम साजरा करण्यासाठी आणि हे सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगला कोणता असू शकेल’, असं लिहित अनुष्काने हे फोटो पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

यातील पहिला फोटो हा अनुष्काच्या ‘परी’ या हॉरर चित्रपटाचा पोस्टर आहे. नेटकऱ्यांनी अनुष्काचा फोटो एडिट करत तिच्या मागे विराटचा फोटो लावला होता. ‘मला माहीत आहे की तू नेहमीच माझ्या पाठिशी आहेस’, असं वर्णन तिने या मीमचं केलंय.

अनुष्काची पोस्ट-

‘दुसरा फोटो- आमच्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे (आम्ही दोघंही अत्यंत भाग्यवान आहोत). तिसरा फोटो- माझ्या प्रदीर्घ आणि अत्यंत वेदनादायी प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशी तू हॉस्पिटलच्या बेडवर विश्रांती घेताना. चौथा फोटो- गोष्टींबद्दल दोघांचीही अत्यंत चांगली निवड, पाचवा फोटो- असाच एखादा माणूस, सहावा फोटो- तुझ्या हटके हावभावांनी तू माझे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्यासारखे बनवतोस, सातवा फोटो- तुझ्यासोबत आज, उद्या आणि कायम राहण्यासाठी चिअर्स’, अशी हटके पोस्ट अनुष्काने लिहिली.

अनुष्काच्या या पोस्टवर विराट कमेंट करणार नाही, असं होणारच नाही. ‘माझं प्रेम’ अशी एक कमेंट त्याने केली. त्यानंतर त्याने लिहिलं, ‘तुझ्याकडे नक्कीच माझे सर्वोत्कृष्ट फोटो आहेत’.

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीतल्या टस्कनी इथं 800 वर्षे जुन्या विला बोर्गो फिनोचिएटोमध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी अनुष्काने वामिकाला जन्म दिला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.