Confirm… विराट कोहली – अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन? खास व्हिडीओ व्हायरल

Anushka Sharma : विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात होणार नव्या पाहुण्याचं स्वागत... अनुष्काचा 'असा' व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र विराट - अनुष्का यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Confirm... विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात होणार नव्या पाहुण्याचं आगमन? खास व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 9:58 AM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातील स्टार कपल क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सध्या अनुष्का आणि विराट विश्वचषकाच्या सामन्यासाठी बेंगळुरूमध्ये आहेत. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांचा हात धरुन चालताना दिसत आहेत. विरुष्काच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्का हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा जोर धरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का तिच्या प्रेग्नेंसीमुळे तुफान चर्चेत आहे. प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरु असताना अनुष्का लाईमलाईट पासून देखील दूर आहे. नुकताच, अभिनेत्रीला पती विराट कोहली याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. तेव्हा अनेकांच्या नजरा अनुष्का हिच्या बेबी बम्पकडे येऊन थांबल्या.

हे सुद्धा वाचा

अनुष्का शर्मा पती विराट कोहली याला चिअर-अप करण्यासाठी बंगळुरूमध्ये दाखल झालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वर्ल्डकप सामना नेदरलँड्ससोबत बंगळुरू येथे आहे. 12 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड सामना खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी विराट – अनुष्का एकत्र दिसले. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. एक नेटकरी म्हणाला ‘अनुष्का प्रेग्नेंट आहे. मला असं वाटतं वर्ल्ड कपनंतर दोघे अधिकृत घोषणा करतील…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये देखील अनुष्का अशीच दिसत होती…’ तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘वर्ल्ड कप पण येईल आणि बेबी सुद्धा…’

सध्या विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त नव्या पाहुण्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर अनुष्का हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असते. पण अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होण्याच्या चर्चांवर मौन बाळगलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.