IND vs PAK | टीम इंडियाच्या ‘विराट’ विजयावर अनुष्काची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

IND vs PAK | टीम इंडियाचा विजय, अनुष्काला भावना अनावर म्हणाली, "ही माझ्या आयुष्यातली..."

IND vs PAK | टीम इंडियाच्या 'विराट' विजयावर अनुष्काची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली...
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 7:23 PM

मुंबई- मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियाने आज पाकिस्तानवर (IND vs PAK) दमदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक विराट कोहली (Virat Kohli) ठरला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या आहेत. संपूर्ण देशासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. या खेळानंतर मैदानात विराट भावूक झाला होता. विराटच्या प्रत्येक सुखादु:खात साथ देणारी त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. टीम इंडियाचा विजय पाहून अनुष्कालाही भावना अनावर झाल्या.

अनुष्का शर्माची पोस्ट-

‘सुंदर, अत्यंत सुंदर! आज रात्री तू अनेकांच्या आयुष्यात आनंद आणलंस आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला. तू खरंच एक अद्भुत व्यक्ती आहेस. तुझी जिद्द, तुझा विश्वास जबरदस्त आहे. मी हे नक्की म्हणू शकते की मी माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम सामना आज पाहिला,’ अशा शब्दांत अनुष्काने आनंद व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

‘आपली मुलगी हे समजण्यासाठी आता खूप लहान आहे की तिची आई आनंदाने का नाचत होती? पण एके दिवशी तिला हे समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी हा टप्पा खूप कठीण होता, पण तो त्यातून आधीपेक्षा अधिक मजूबत आणि यशस्वीपणे बाहेर आला. मला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्यावर माझं कायम प्रेम असेल,’ असं तिने पुढे लिहिलं.

प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. मी कृतज्ञ आहे आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, अशा शब्दांत विराटनेही भावना व्यक्त केल्या.

रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर विराट कोहली भावूक झाला होता. आधी तो आनंदाने ओरडला पण नंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. विराट कोहलीला अनेकदा विजयानंतर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना पाहिलं गेलं. पण आज पहिल्यांदाच चॅम्पियन कोहलीच्या डोळ्यात पाणी होतं. विराटसोबत हार्दिक पंड्यासुद्धा भावूक झाला होता.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.