अनुष्का शर्मा अखेर परतली भारतात, पण कुठे आहे मुलं? इतका बदलला अभिनेत्रीचा लूक
Anushka Sharma: अनेक महिन्यांनंतर भारतात परतली अनुष्का शर्मा, पण वामिका आणि अकाय नाहीत सोबत, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर इतका बदलला लूक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...
अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने बॉलिवडूमधून ब्रेक घेतला. अनुष्का शर्मा हिने जेव्हा दुसऱ्या बाळाला लंडन याठिकाणी जन्म दिला आहे, तेव्हा पासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये राहात आहे. पण नुकताच अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनुष्का शर्मा हिला बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्रीला पाहताच पापाराझींनी गर्दी केली. अनुष्का हिने देखील पापाराझींसाठी पोज दिली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
अनेक महिन्यांनंतर अनुष्का मुंबईत आली आहे. पण अभिनेत्री सोबत लेक वामिका कोहली आणि मुलगा अकाय कोहली नसल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अनुष्का हिला काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये स्पॉट करण्यात आलं. सिनेमांमध्ये बोल्ड आणि हॉट दिसऱ्या अनुष्का अनेक दिवसांनंतर चाहत्यांनी दिसली. सांगायचं झालं तर, विराट आणि अनुष्का मुलांसोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरला आहे.
View this post on Instagram
विराट – अनुष्का यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये दोघांनी खासगी पद्धतीत लग्न केलं. अनुष्का हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. करियरमध्ये उच्च शिखरावर असताना अनुष्काने विराट कोहली याच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये लेक वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर 2023 मध्ये विराट – अनुष्का यांनी अकाय याचं जगात स्वागत केलं. मुलांच्या जन्मानंतर विराट – अनुष्का यांनी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. सोशल मीडियावर अनुष्का मुलांसोबत फोटो पोस्ट करत पण कधीच चेहरा दाखवत नाही.
View this post on Instagram
अनुष्का आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अनुष्काच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.