विराट – अनुष्का यांनी दाखवला मुलगा अकाय याचा चेहरा? पोस्ट व्हायरल
Anushka Sharma - Virat Kohli | एकाच अटीवर अनुष्का - विराट यांनी दाखवली लेक आकाय याचा चेहरा... सध्या सर्वत्र कोहली कुटुंबाची चर्चा..., अनुष्का - विराट यांनी लेक वामिका हिच्यासाठी 'नो फोटो पॉलिसी' कायम ठेवली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून दोघे देखील त्यांच्या मुलांमुळे चर्चेत आहेत. अनुष्का – विराट यांनी त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी अनुष्का हिने मुलाला जन्म दिला. पण अद्यापही अनुष्का – विराट यांनी मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत. पण आता अनुष्का – विराट यांनी मुलाची पहिली झलक पापाराझींना दाखवली आहे…
सध्या सोशल होत आहे. पोस्टनुसार, अनुष्का – विराट यांना त्यांच्या मुलांसोबत नुकताच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान, अनुष्का हिने मुलगा अकाय याचा चेहरा पापाराझींना दाखवला आहे.
View this post on Instagram
पण अभिनेत्रीने एकाच अटीवर अकाय याचा चेहरा पापाराझींना दाखवला आहे. अभिनेत्री म्हणाली, पापाराझींना अकाय याची पहिली झलक दाखवत आहे. पण कोणालाही फोटो काढण्याची परवानगी अभिनेत्रीने दिली नाही… अभिनेत्रीने पापाराझींना वचन दिलं आहे की, जेव्हा अभिनेत्रीसोबत तिचे दोन मुलं नसतील ती पापाराझींसाठी पोज देईल… सध्या सर्वत्र फक्त अनुष्का – विराट आणि त्यांच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, लग्नापूर्वी पासून अनुष्का – विराट त्यांच्या खासगी आयुष्य लाईमलाईट पासून दूर ठेवत आहेत. दोघांनी लग्न देखील फार पाहुण्यांच्या उपस्थितीत केलं आहे. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर अनुष्का हिने 2021 मध्ये मुलगी वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्रीने 15 फेब्रुवारी 2024 मध्ये मुलगा अकाय याला जन्म दिला.
अकाय याच्या जन्माची माहिती दोघांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. अनुष्का हिने दुसऱ्या बाळाला लंडन याठिकाणी जन्म दिला. अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची गोष्ट देखील गुपित ठेवली होती. अखेर मुलाच्या जन्मनंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली..
सांगायचं झालं तर, मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्री बॉलिवूडपासून निरोप घेतला. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? याची देखील चर्चा रंगली आहे. अनुष्का बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
आज अनुष्का बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.