विराट कोहली नाही, ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात होती अनुष्का शर्मा, धोनीचा आहे खास मित्र
Anushka Sharma Love Life | विराट कोहली नाहीतर, सर्वात आधी 'या' भारतीय क्रिकेटरवर जडला होता अनुष्का शर्मा हिचा जीव, तो आहे धोनी याचा खास मित्र... जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या खासगी आयुष्याचीच चर्चा...
बॉलिवूडची प्रसिद्ध, लोकप्रिय अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू याची पत्नी अनुष्का शर्मा हिचा आजा वाढदिवस आहे. म्हणून सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली आहे. अनुष्का आता विराट कोहली याच्यासोबत वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. विराट आणि अनुष्का यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटत लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण विराट कोहली याच्यासोबत लग्न करण्याआधी अनुष्का हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेत्री फक्त विराट यालाच नाही अन्य एका भारतीय क्रिकेटरला देखील डेट केल्याची चर्चा रंगली आहे.
विराट याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का ज्या क्रिकेटरला डेट केल्याची चर्चा रंगली होती तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधान धोनी याचा देखील खास मित्र आहे. रिपोर्टनुसार बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का हिच्या नावाची चर्चा क्रिकेटर सुरेश रैना याच्यासोबत रंगली होती.
जवळपास 2012 मध्ये अनुष्का शर्मा आणि सुरेश रैना यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची कधीच अधिकृत घोषणा केली नाही. अशात हळू – हळू अनुष्का शर्मा आणि सुरेश रैना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बंद झाल्या. पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अनुष्का शर्मा आणि सुरेश रैना यांच्या नात्याची चर्चा होती.
सांगायचं झालं तर, अनुष्का शर्मा हिच्या नावाची चर्चा फक्त सुरेश रैना याच्यासोबतच नाहीतर, अनेक अभिनेत्यांसोबत देखील रंगली होती. अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांना देखील अनुष्का हिने डेट केल्याच्या चर्चा एकेकाळी रंगल्या होत्या. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अखेर अनुष्का शर्मा हिच्या आयुष्यात विराट कोहली याची एन्ट्री झाली आणि अभिनेत्रीला तिचं आयुष्यभराचं प्रेम मिळालं. विराट आणि अनुष्का यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत 2017 मध्ये लग्न केलं.
लग्नानंतर अनुष्का शर्मा फार कमी सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. लग्नानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये मुलगी वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री 2024 मध्ये लंडन याठिकाणी मुलाला जन्म दिला. विराट – अनुष्का यांच्या मुलाचं नाव अकाय असं आहे. सध्या अनुष्का मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.