Anushka Sharma | दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्का शर्मा घेणार मोठा निर्णय? चर्चांना उधाण

Anushka Sharma | दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्का शर्मा हिच्या आयुष्यात होणार मोठे बदल? व्हायरल व्हिडीओमुळे सत्य समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा आणि तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. नक्की काय आहे सत्य...

Anushka Sharma | दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्का शर्मा घेणार मोठा निर्णय? चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 2:58 PM

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री अनु्ष्का शर्मा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत अनुष्का हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. अनुष्का फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. पण यावर अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे विराट आणि अनुष्का कधी स्वतःहून चाहत्यांना ‘गुडन्यूज’ देतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.. दरम्यान, अनुष्का हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ एका मुलाखती दरम्यानचा आहे. ज्यामध्ये अनुष्का लग्न आणि आई झाल्यानंतर सिनेमात काम करणार नाही असं म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ अभिनेत्रीच्या लग्नापूर्वीचा आहे. सिमी ग्रेवाल यांच्या शोओमध्ये अभिनेत्री म्हणते, ‘मला लग्न करायचं आहे. मला मुलं देखील हवी आहेत. पण लग्न आणि आई झाल्यानंतर मी कदाचित सिनेमांमध्ये काम करणार नाही…’ सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, विराट आणि अनुष्का यांनी २०१७ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीचा ‘झिरो’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. त्यानंतर एकाही सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का चाहत्यांच्या भेटीस आली नाही. त्यानंतर २०२१ मध्ये अनुष्का हिने मुलगी वामिका हिला जन्म दिला.

आता अभिनेत्री दुसऱ्या प्रग्नेंसीमळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्का यांना मॅटरनिटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा ही गोष्ट लिक करु नका… अशी विनंती दोघांनी पापाराझी यांना केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे.

अनुष्का शर्मा हिचा आगामी सिनेमा

अनुष्का शर्मा हिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री झूलन गोस्वामी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. पण अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा आणि तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.