लंडनमध्ये विराट कोहली याचा पाठलाग, क्रिकेटर भडकला, अनुष्का शर्मा दिसली अकायसोबत..
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षापासून चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा ही कायमच दिसते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्या आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये खास वेळ घालत आहेत. टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतातून थेट लंडनला आपल्या कुटुंबाकडे विराट कोहली गेला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे आता भारत सोडून विदेशामध्येच शिफ्ट होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. हेच नाही तर अनुष्का शर्मा हिने काही महिन्यांपूर्वीच मुलाला विदेशात जन्म दिला. विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विराट आणि अनुष्का यांच्याकडून मुलगा झाल्याचे सांगण्यात आले आणि मुलाच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली.
मुलाच्या जन्मानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्येच शिफ्ट झाले आहेत. आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा लंडनमधील खास व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि त्यांचा मुलगा अकाय दिसतोय. अनुष्का शर्मा हिच्याजवळ अकाय व्हिडीओमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुढे विराट अकायला घेताना दिसतोय.
यावेळी विराट कोहली याच्या लक्षात आले की, कोणीतरी व्हिडीओ शूट करत आहे. विराट कोहली हा कॅमेऱ्याकडे रागाने बघताना दिसतोय. विराट कोहली हा अनुष्काला सांगताना देखील दिसला. अनुष्का शर्मा ही देखील नाराज होऊन बघताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अकाय हा अनुष्का शर्मा हिच्याजवळ आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
View this post on Instagram
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे मुलांना खासगी आयुष्य मिळावे आणि सामान्य लोकांसारखे जीवन जगता यावे, याकरिता विदेशात गेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लंडनमधील यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्ये स्पॉट झाले.
यावेळी दोघेही शॉपिंग करून निघताना दिसले. रस्ता ओलांडताना अनुष्का आणि विराट कोहली हे दिसले. अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच नाश्त्याची प्लेट सोशल मीडियावर शेअर केली होती. नाश्त्याच्या प्लेटमध्ये खूप सारे फळ दिसत होते. रक्षाबंधनच्या दिवशीही अनुष्का शर्मा हिने राखीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अनुष्का चित्रपटांपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.