AP Dhillon: प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन दुखापतग्रस्त; प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना

एपी ढिल्लनच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी; दुखापतीमुळे पुढे ढकलला कॉन्सर्ट

AP Dhillon: प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन दुखापतग्रस्त; प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना
गायक एपी ढिल्लनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 1:50 PM

चंदीगड- प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी ढिल्लनशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एपी ढिल्लनला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुद्द त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये एपी ढिल्लन रुग्णालयाच्या बेडवर दुखापतग्रस्त असल्याचं पहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्याचे सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजिलिसमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. मात्र या कॉन्सर्ट्सची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल एपी ढिल्लने चाहत्यांची माफी मागितली आहे.

रुग्णालयातील फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘कॅलिफोर्नियातील माझ्या सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो की माझे सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजिलिसमधील कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आले आहेत. दौऱ्यावर असताना मी दुखापतग्रस्त झालो आणि त्यामुळेच कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. माझी प्रकृती आता ठीक आहे. मात्र यावेळी मी परफॉर्म करू शकणार नाही. काही आठवड्यांतच आपण पुन्हा भेटू. तुम्हा सर्वांना भेटण्याची आणि तुमची माफी मागण्याची मी वाट पाहतोय.’

हे सुद्धा वाचा

ज्या चाहत्यांनी एपी ढिल्लनच्या आगामी कॉन्सर्टची तिकिटं विकत घेतली आहेत. तिच तिकिटं नव्या शेड्युलसाठी लागू होणार आहेत. नव्या पोस्टमध्ये त्याने कॉन्सर्टच्या नव्या तारखासुद्धा जाहीर केल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी आयोजित कॉन्सर्ट आता 13 आणि 14 डिसेंबरला होणार आहे. तर लॉस एंजिलिसमध्ये आयोजित 4 नोव्हेंबरचं कॉन्सर्ट आता 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

एपी ढिल्लनच्या गाण्यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावतात. ‘ब्राऊन मुंडे’, ‘एक्स्युसेस’ ही त्याची गाणी खूप गाजली आहेत.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....