प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरावर कुख्यात गुंडकडून गोळीबार, कसे आहेत कुटुंबिय? मोठी माहिती समोर
Bollywood : बॉलिवूडवर कुख्यात गुंडांची दहशत... प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या घरावर गोळीबार, कसे आहेत कुटुंबिय, माहिती देत सेलिब्रिटी म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटीच्या पोस्टची चर्चा...

पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लो यांच्या कॅनडा येथील घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सिनेश्वात खळबळ माजली. या घटनेची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर एपी ढिल्लोच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आता अमृतपाल सिंग ढिल्लो उर्फ एपी ढिल्लो याने कॅनडातील त्याच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत मौन सोडलं आहे. गायकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे की तो सुरक्षित आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत एपी ढिल्लो म्हणाला, ‘मी आता सुरक्षित आहे. माझ्या कुटुंबातील लोकं देखील सुरक्षित आहेत. माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्याकडून मिळणारा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. सर्वांना शांती आणि प्रेम…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एपी ढिल्लोच्या घरावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.
एपी ढिल्लो याला देण्यात आली धमकी…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, 1 सप्टेंबरच्या रात्री एपी ढिल्लोच्या दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती. एक हल्ला व्हिक्टोरिया बेटावरील गायकाच्या घरी झाला, तर दुसरा हल्ला टोरंटोमधील वुडब्रिज येथील त्याच्या घरी झाला.
View this post on Instagram
पंजाबी गायकाची सलमान खानशी मैत्री असल्याने हा गोळीबार करण्यात आल्याची धमकीही लॉरेन्सच्या टोळीने दिली आहे. सलमान खानपासून दूर राहून स्वतःच्या मर्यादेत राहा, नाहीतर त्यालाही कुत्र्याने मारले जाईल, अशी धमकी एपी ढिल्लोनला मेसेजमध्ये देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याच्या घरावर देखील झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.