WPL 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये AP Dhillon च्या ‘या’ कृतीमुळे चाहते नाराज; सुनावले खडेबोल

तो स्टेजवर येताच चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ पहायला मिळाली. संपूर्ण स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा जल्लोष होऊ लागला होता. मात्र थोड्याच वेळानंतर हा सर्व उत्साह रागात बदलला.

WPL 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये AP Dhillon च्या 'या' कृतीमुळे चाहते नाराज; सुनावले खडेबोल
AP DhillonImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:31 AM

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर ए. पी. ढिल्लनचे भारतासह जगभरात लाखो चाहते आहेत. ‘ब्राऊन मुंडे’, ‘इन्सेन’ आणि ‘एक्सक्युजेस’ यांसारखी त्याची गाणी तुफान गाजली. तरुणाईमध्ये त्याची खूप क्रेझ आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या कॉन्सर्टला हजेरी लावण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्सुक असतात. ए. पी. ढिल्लनच्या लाइव्ह कॉन्सर्टला लाखोंची गर्दी पहायला मिळते. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात प्रेक्षकांना वेगळंच पहायला मिळालं. ए. पी. ढिल्लनचा व्हिडीओ शेअर करत नेटकरी त्याच्यावर नाराजी दर्शवत आहेत.

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये वुमेन प्रीमिअर लीगची (WPL 2023) ओपनिंग सेरेमनी पार पडली. यावेळी ए. पी. ढिल्लनने लाइव्ह परफॉर्म केलं. तो स्टेजवर येताच चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ पहायला मिळाली. संपूर्ण स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा जल्लोष होऊ लागला होता. मात्र थोड्याच वेळानंतर हा सर्व उत्साह रागात बदलला.

हे सुद्धा वाचा

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्यांना यावेळी ए. पी. ढिल्लनचा परफॉर्मन्स आवडला नाही. WPL दरम्यान त्याने सुरुवातीला ब्राऊन मुंडे, तेरे ते, एक्सक्युजेस अशी लोकप्रिय गाणी गाऊन मैफिल जमवली. मात्र थोड्या वेळानंतर त्याने गाणं बंद केलं आणि संपूर्ण शोदरम्यान फक्त लिप-सिंकिंग केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. ए. पी. ढिल्लनचा हा आतापर्यंतचा सर्वांत वाईट परफॉर्मन्स असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

एपी ढिल्लनच्या गाण्यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावतात. ‘ब्राऊन मुंडे’, ‘एक्स्युसेस’ ही त्याची गाणी खूप गाजली आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एपी ढिल्लनला दुखापत झाली होती. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये एपी ढिल्लन रुग्णालयाच्या बेडवर दुखापतग्रस्त असल्याचं पहायला मिळालं होतं. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्याचे सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजिलिसमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. मात्र या कॉन्सर्ट्सची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

ए. पी. ढिल्लनशिवाय कियारा अडवाणीनेही या ओपनिंग सेरेमनीमध्ये दमदार परफॉर्म केलं. त्यानंतर कृती सनॉनचाही जबरदस्त परफॉर्मन्स पहायला मिळाला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.