‘रात्रीस खेळ चाले 3’ ला शेवंताचा रामराम, ‘या’ कारणामुळे सोडली मालिका, वाचा काय घडले?

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या पात्रासाठी अपूर्वाला 10 किलो वजन वाढवावे लागले होते. मात्र या वाढलेल्या वजनामुळे मालिकेतील ज्युनियर कलाकारांकडून अपूर्वाचे वारंवार विडंबण केले जात होते.

'रात्रीस खेळ चाले 3' ला शेवंताचा रामराम, 'या' कारणामुळे सोडली मालिका, वाचा काय घडले?
'रात्रीस खेळ चाले 3' ला शेवंताचा रामराम
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 9:41 PM

मुंबई : कोकणातील जीवनशैली, भाषा, तेथील भूताटकी यावर सुरु असलेली झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील सर्वच पात्रं आपापली भूमिका उत्तम निभावत आहेत. मात्र या मालिकेच्या तीनही सिझनमध्ये प्रेक्षकांना वेड लावले ते ‘शेवंता’ने. मालिकेत शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने निभावली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने अपूर्वाने शेवंताची भूमिका सहज निभावली आहे. मात्र यापुढे अपूर्वा नेमळेकर या मालिकेत दिसणार नाही. काही ज्युनियर सहकलाकारांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अपूर्वाने ही मालिक सोडण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ कारणामुळे अपूर्वाचा मालिकेला रामराम

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या पात्रासाठी अपूर्वाला 10 किलो वजन वाढवावे लागले होते. मात्र या वाढलेल्या वजनामुळे मालिकेतील ज्युनियर कलाकारांकडून अपूर्वाचे वारंवार विडंबण केले जात होते. उघडपणे खिल्ली उडवत जिव्हारी लागतील अशा कमेंट्स पास केल्या जात होत्या. वरिष्ठांकडे कारवाई केल्यानंतही या कलाकारांकडून दिलगिरी व्यक्त केली जात नव्हती. तसेच प्रोडक्शन हाऊसकडून आठवड्यातून 5 ते 6 दिवसांचं शुटिंग असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच चॅनेलकडून आणखी एक शो देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठवड्यात एकच दिवस शुटिंग व्हायचे आणि बाकी पुढचे 3-4 दिवस बसून रहावे लागायचे. चॅनेलकडून दुसरा शो देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. या सर्व कारणांमुळे त्रस्त झाल्याने अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

इन्स्टाग्रामवरुन अपूर्वाने केला खुलासा

अपूर्वाने आपले सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवरुन मालिका का सोडली याबाबत खुलासा केला आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केले. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल आणि माझ्या अवहेलना होत असेल. नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करणे आपल्या तत्वात बसत नसल्याचे अपू्र्वाने म्हटले आहे. तसेच एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना मजा आली, समाधान मिळाले. शेवंताची भूमिका आपल्याला खूप काही देऊन गेली. ‘शेवंता’ म्हणून आपली एक ओळख आणि जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले, असेही तिने नमूद केले. (Apoorva Nemalekar leaves the Ratris Khel Chale 3 daily soap)

इतर बातम्या

Atrangi Re Trailer : अक्षय कुमार आणि धनुष ‘या’ दोघांच्या प्रेमात सारा अली खान; अतरंगी है लव्ह ट्रँगल

कपिल शर्मा शोच्या सेटवर स्मृती इराणींना ‘नो एंट्री’! पाहा नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.