Malaika Arora: मलायका-अरबाजला पुन्हा एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, ‘मुलासाठी वाईट वाटतं..’

मुलासाठी अरबाज-मलायका पुन्हा दिसले एकत्र; व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

Malaika Arora: मलायका-अरबाजला पुन्हा एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, 'मुलासाठी वाईट वाटतं..'
Arbaaz and MalaikaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 12:34 PM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील या शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसणार आहे. नुकताच या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये मलायकाने तिच्या आणि अरबाज खानच्या घटस्फोटामागील खरं कारण काय, याबद्दल सांगितलं. घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायका हे मुलासाठी वारंवार एकत्र दिसतात. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. मुलासाठीच पुन्हा एकदा या दोघांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं.

अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान हा शिक्षणासाठी परदेशी गेला होता. तो भारतात परतताच त्याला भेटण्यासाठी दोघंही मुंबई विमानतळावर पोहोचले होते. यावेळी मुलाला भेटल्यानंतरचा आनंद मलायका आणि अरबाजच्या चेहऱ्यावर स्पष्ट पहायला मिळत होता. तसंच अरहानसुद्धा दोघा पालकांना पाहिल्यानंतर खूश दिसला.

हे सुद्धा वाचा

या तिघांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘दोघं एकमेकांच्या आयुष्याचा ज्याप्रकारे आदर करत आहेत, ते पाहून बरं वाटतं. विभक्त झाल्यानंतरही खूश राहता येतं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही जोडी खूपच चांगली आहे. कधीच एकमेकांवर वाईट आरोप केले नाहीत. मुलासाठी दोघं नेहमी एकत्र येतात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

कमेंट बॉक्समध्ये काहींनी अरहानविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. मुलासाठी वाईट वाटतं, पालकांनी नेहमी एकत्र राहायला हवं, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये लग्न केलं. तर 2017 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. “आता घटस्फोटानंतर आम्ही नीट बोलू लागलो आहोत असं मला वाटतंय. दबंग हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमचं ठीकठाक चाललं होतं. पण त्यानंतर आम्ही एकमेकांविषयी चिडचिडे झालो. आमच्या नात्यातील अंतर दिवसेंदिवस वाढतच गेलं”, असं मलायकाने तिच्या शोमध्ये सांगितलं.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.