अरबाज खान याचं दुसऱ्या लग्नानंतर मोठं वक्तव्य, मलायकाबद्दल म्हणाला, ‘आजही आम्ही एकत्र कारण…’
'आजही आम्ही एकत्र कारण...', दुसऱ्या लग्नानंतर देखील मलायका विसरु शकला नाही अरबाज खान! मुलाखतीत पहिल्या बायकोबद्दल केलं मोठं वक्तव्य, मुलाबद्दल म्हणाला..., लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय
Arbaaz Khan: अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाला जवळपास 7 वर्ष झाली आहेत. असं असताना देखील दोघांमधील नातं आजही तितकच खास असल्याचं दिसत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अरबाज याने मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. शिवाय दोघांच्या घटस्फोटादरम्यान, मुलगा अरहान खान याने कशी सर्व परिस्थिती सांभाळली यावर देखील अरबाज खान याने मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलगा अरहान खान याच्याबद्दल बोलतना अरबाज म्हणाला, ‘मलायका सोबत घटस्फोट झाल्यानंतर एका नात्यात आम्ही अडकलो आहोत आणि ते नातं म्हणजे अरहान याच्यासोबत असलेले नातं… आमच्या एकत्र अनेक आठवणी आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा मुलगा अरहान… आमच्या नात्यामध्ये काही अडथळे आले त्यामुळे मलायका आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…’ असं देखील अरबाज खान म्हणाला.
View this post on Instagram
मलायका अरोरा हिच्या कुटुंबासोबत असलेल्या नात्यावर देखील अरबाज याने मौन सोडलं. अभिनेता म्हणाला, ‘मलायकाच्या कुटुंबियांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अरहान याने देखील घटस्फोटानंतर सर्वकाही योग्य प्रकारे संभाळून घेतलं. आता तो मोठा होत आहे आणि सर्वकाही त्याला समजत आहे…’
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा अरबाज खान सर्वात आधी मलायका हिच्या वडिलांच्या घरी पोहोचला. तेव्हा मलायका आणि तिच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण खान कुटुंब होतं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होते.
अरबाज खान याचं दुसरं लग्न
View this post on Instagram
अरबाज खान याने डिसेंबर 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान खान देखील उपस्थित होता. लग्नानंतर देखील अरहान याला अनेकदा सावत्र आईसोबत स्पॉट करण्यात आलं.