अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडला अनुपम खेरच्या मुलाने केलं किस; डेटिंगच्या चर्चा

अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अनुपम खेर यांच्या मुलासोबत दिसून येतेय. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सिकंदर खेर तिला किस करतो.

अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडला अनुपम खेरच्या मुलाने केलं किस; डेटिंगच्या चर्चा
अरबाज खान, जॉर्जिया अँड्रियानी, अनुपम खेरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 1:24 PM

अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. त्यापूर्वी तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. आता जॉर्जियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अरबाजशी ब्रेकअप केल्यानंतर तिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. अत्यंत बोल्ड अंदाजात जॉर्जिया नुकतीच एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने सोनेरी रंगाचा शॉर्ट बॅकलेस ड्रेस घातला होता. या रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतर जॉर्जियासोबत एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीसोबत तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. इतकंच नव्हे तर फोटोसाठी पोझ देताना त्या व्यक्तीने जॉर्जियाला किससुद्धा केलं. ही व्यक्ती स्टारकिड असून त्याचे वडील बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. या स्टारकिडचं नाव सिकंदर खेर आहे आणि त्याचे वडील अनुपम खेर आहेत.

जॉर्जिया अँड्रियानी आणि सिकंदर खेरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सिकंदर आणि जॉर्जिया एकमेकांच्या खूप जवळ येतात. यानंतर जॉर्जिया तिचा ड्रेस ठीक करण्यासाठी त्याच्यापासून थोडी दूर जाते. नंतर सिकंदर तिला पुन्हा जवळ घेऊन डोक्यावर किस करतो. या व्हिडीओमुळे जॉर्जिया आणि सिकंदर यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर याने 2008 मध्ये ‘वुडस्टॉक व्हिला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘खेलें हम जी जान से’, ‘प्लेयर्स’, ‘औरंगजेब’, ‘तेरे बिन लादेन: डेड ऑर अलाइव्ह’ आणि ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. 2020 मध्ये तो ‘आर्या’ या ड्रामा सीरिजमध्ये झळकला. सिकंदर हा किरण खेर आणि त्यांचे पहिले पती गौतम बेरी यांचा मुलगा आहे. तो अनुपम खेर यांचा सावत्र मुलगा आहे.

अरबाजने 2017 मध्ये मलायका अरोराला घटस्फोट दिला. त्यानंतर तो इटलीची मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जियाला डेट करू लागला होता. हे दोघं बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर जॉर्जियाने एक मुलाखत दिली होती. त्यात ती अरबाज आणि मलायकाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. अरबाजसोबत ब्रेकअप झालं असलं तरी माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील, प्रेम असेल, असंही ती म्हणाली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.