गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आर्टिस्ट शुरा खान हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर अरबाज दुसरी पत्नी शुरा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. आता खुद्द शुरा हिने अरबाज याच्यासोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दोघे देखील आनंदी दिसत आहेत. अरबाज ड्राईव्ह करत असताना शुरा हिने पतीचा व्हिडीओ शूट केला आहे.
व्हिडीओमध्ये अरबाज गाणी देखील गाताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत शुरा हिने कॅप्शनमध्ये ‘Night Drives’ असं लिहिलं आहे. व्हिडीओवर फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त शुरा खान हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
शुरा खान आणि अरबाज यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कारण दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा कुठेच रंगल्या नाही. अरबाज याने कधीच शुरा हिला डेट करत असल्याची माहिती समोर येऊ दिली नाही.
अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नुकताच, एका कार्यक्रमासाठी अरबाज खान याची पहिली पत्नी मलायका अरोरा आणि शुरा खान आमने – सामने आल्या होत्या.
अरबाज खान याने पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर अरबाज – मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मलायका – अरबाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली.
लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांचा घटस्फोट झाला. पण मुलासाठी दोघांना अनेकदा एकत्र येताना स्पॉट करण्यात आलं. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन – मलायका यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.