घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला “मी जरी तिच्याशी बोलत असेन..”

अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना 20 वर्षीय अरहान हा मुलगा आहे. अरहान अमेरिकेत त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला मी जरी तिच्याशी बोलत असेन..
Malaika Arora and Arbaaz KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 8:04 AM

मुंबई : अभिनेता अरबाज खान सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी विविध कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अरबाज बऱ्याच मुलाखतींसाठी स्वतःचा वेळ आवर्जून काढतो. इतकंच नव्हे तर त्याचा स्वतःचा ‘द इनविंसिबल्स’ हा शो चांगलाच गाजला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचसोबत त्याने घटस्फोटानंतरही तिच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मलायकासोबत चांगलं नातं ठेवल्यामुळे ट्रोलिंग होत असताना मनात काय भावना असते, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “जग काय म्हणतंय याने मला फरक पडत नाही. लोक तर विविध प्रकारे बोलत असतात. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर अशा लोकांशी मी डील करत नाही. लोक फक्त अशा गोष्टींबद्दल बोलतात जे त्यांना बाहेर दिसतंय. मात्र हे लोक माझ्या घरी हे पाहायला नसतात ना की मी काय करतोय?”

हे सुद्धा वाचा

याविषयी अरबाज पुढे म्हणाला, “असं नाहीये की आम्ही फक्त कॅमेरासमोर चांगले वागतो. आम्ही एकत्र अरहानचा वाढदिवस साजरा करतो. मी माझ्या मुलाचं काम, त्याचं करिअर, गरजा आणि जबाबदाऱ्या यांविषयी मलायकासोबत नेहमी चर्चा करतो. मात्र मला एक गोष्ट समजत नाही की जर मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत बोलत असेन, तर ते पाहून लोकांना आश्चर्य का वाटतं? जर माझ्या मुलाचा फोन लागत नसेल किंवा व्यस्त असेल तर मी माझ्या एक्स-वाइफ मलायकालाच कॉल करतो.”

“मलायका आणि मी पूर्णपणे विभक्त झालोय आणि आम्ही फक्त आपापल्या आयुष्याचाच विचार करतो, असा विचार जर लोक करत असतील तर ते खूपच भोळे आहेत. असं कधीच होत नसतं. जर घटस्फोटीत पालक एकमेकांशी बोलणं थांबवत असतील तर त्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ लागले. सुदैवाने आमच्या कुटुंबाला त्याची भीती नाही. अरहानने मला आणि त्याच्या आईला, आहोत तसं स्वीकारलं आहे. तोसुद्धा ठीक आहे”, असं उत्तर अरबाजने दिलं.

अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना 20 वर्षीय अरहान हा मुलगा आहे. अरहान अमेरिकेत त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करतोय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.