Arbaaz Khan | “त्यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा..” सावत्र आई हेलनबद्दल अरबाजचं वक्तव्य

सलीम आणि सलमा यांना सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान ही तीन मुलं आहे अलविरा अग्निहोत्री ही एक मुलगी आहे. सलीम यांनी हेलनसोबत मिळून अर्पिताला दत्तक घेतलं. हे संपूर्ण खान कुटुंब अनेकदा वाढदिवस, ईद, डिनरसाठी एकत्र येतात.

Arbaaz Khan | त्यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा.. सावत्र आई हेलनबद्दल अरबाजचं वक्तव्य
Helen and Arbaaz KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:42 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : अभिनेता अरबाज खान याआधीच्या काही मुलाखतींमध्येही वडील सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पुन्हा एकदा हेलन यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी दिलखुलासपणे व्यक्त झाला. हेलन या सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. हेलन यांच्याशी लग्न करताना सलीम खान आधीच सलमा यांच्याशी विवाहित होते. दुसऱ्या लग्नानंतरही सलीम आणि सलमा यांनी कधीच घटस्फोटाचा निर्णय घेतला नाही. इतकंच नव्हे तर सलमा आणि हेलन यांच्यातही सलोख्याचं नातं आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अरबाज त्याच्या कुटुंबातील या नात्यांविषयी व्यक्त झाला.

या मुलाखतीत अरबाज म्हणाला की सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केलं तरी आम्ही त्यांच्याकडे आई म्हणूनच पहावं अशी अपेक्षा त्यांनी कधीच ठेवली नव्हती. “माझ्या वडिलांनी हेलन आंटीला कधीच आमच्यावर थोपवलं नाही. त्यांना हे माहीत होतं की माझ्या मुलांसाठी त्यांची आई महत्त्वाची आहे. माझ्या आयुष्यात पत्नीशिवाय दुसरी महिला आहे, पण तिचंही स्वत:चं असं आयुष्य, या मताचे ते होते. हेलन आंटीनेही आम्हाला कधीच त्यांच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या फक्त याच गोष्टीने खुश होत्या की त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे, जो त्यांच्यासोबत नेहमी राहील. त्या व्यक्तीचंही दुसरं कुटुंब, पत्नी आणि मुलं आहेत याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्यांनी कधीच आमच्याच फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही”, असं अरबाजने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

वेळेनुसार कुटुंबीयांमधील गोष्टी बऱ्याच अंशी सुधारत गेल्या असंही त्याने सांगितलं. “माझ्या आईसाठी तो ठराविक काळ कठीण होता. पण त्यातून ती पुढे आली. गोष्टी आहेत तशाच ठेवण्यामागील त्यांची काहीही कारणं का असेनात. मुलं किंवा परिस्थितीमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला नाही. पण आईने विचार केला असेल की ठीके, हे जरी घडलं तरी मला या व्यक्तीसोबत राहायचं आहे आणि वडिलांनाही वाटलं असेल की त्यांना माझ्या आईसोबतसुद्धा राहायचं आहे. त्यांनीसुद्धा बराच संघर्ष केला आणि लहान असताना आम्ही डोळ्यांनी ते पाहिलं. त्या सर्व परिस्थितींचा सामना केल्यानंतर आज ते एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाहीत”, असं तो पुढे म्हणाला.

सलीम आणि सलमा यांना सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान ही तीन मुलं आहे अलविरा अग्निहोत्री ही एक मुलगी आहे. सलीम यांनी हेलनसोबत मिळून अर्पिताला दत्तक घेतलं. हे संपूर्ण खान कुटुंब अनेकदा वाढदिवस, ईद, डिनरसाठी एकत्र येतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.