माझा मुलगा आता अनेकांसाठी ‘हॉट प्रॉपर्टी’ बनलाय; अरबाज खान असं का म्हणाला?

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान आता 22 वर्षांचा आहे. अरहानसुद्धा त्याच्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत काम करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या करिअरविषयी नुकताच अरबाज मोकळेपणे व्यक्त झाला.

माझा मुलगा आता अनेकांसाठी 'हॉट प्रॉपर्टी' बनलाय; अरबाज खान असं का म्हणाला?
Arbaaz Khan and Arhaan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 10:50 AM

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा हे 2017 मध्ये विभक्त झाले. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला. आता तो 22 वर्षांचा असून अरहान आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत काम करणार का, असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज त्याच्या मुलाच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. अरहान आता इंडस्ट्रीत ‘हॉट प्रॉपर्टी’ झाला असून माझ्याआधी त्याला कोणी लाँच केलं तर आनंदच होईल, असं अरबाज म्हणाला. मात्र बॉलिवूड पदार्पणाविषयीचा शेवटचा निर्णय हा अरहानचाच असेल, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “चित्रपटासाठी स्क्रिप्ट माझ्याकडून किंवा दुसऱ्यांकडून येऊ शकते. पण सध्या सर्वांची नजर त्याच्यावर आहे. अनेकांसाठी तो हॉट प्रॉपर्टी ठरला आहे. तेच अरहानकडे पाहून ठरवतील. या देशात बरेच निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. प्रत्येकजण नव्या प्रतिभेच्या शोधात आहे. त्यापैकी एखाद्याकडे त्याच्यासाठी प्रोजेक्ट असेल. मी काही ऑफर करण्याआधी त्याला दुसरीकडून संधी मिळाली तरी आनंदच आहे.”

हे सुद्धा वाचा

“मी त्याला लाँच करणार नाही अशी गोष्ट नाही. जर माझ्याकडे त्याच्यासाठी योग्य अशी स्क्रिप्ट असेल तर मी आता किंवा नंतर नक्कीच ऑफर करेन. पण तो प्रोजेक्ट करायचा की नाही, याचा सर्वस्वी निर्णय त्याचाच असेल. मी त्याचा पिता आहे म्हणून त्याने तो प्रोजेक्ट केलाच पाहिजे, असं नाही. तो दुसरीकडे कुठे काम करू शकत नाही, असंही नाही. पण मी त्याला एवढी मोकळीक दिली आहे की तो स्वत:विषयी योग्य निर्णय घेऊ शकतो. तो फिरून मला हेसुद्धा म्हणू शकतो की, डॅड मी आता या गोष्टीसाठी तयार नाही किंवा आपण हे नंतर करुयात का? माझ्याकडे दुसरा चांगला प्रोजेक्ट आहे किंवा तुमच्याआधी मी तो प्रोजेक्ट करू का? तो माझ्यासोबत हे सर्व खुलेपणाने बोलू शकतो”, असं अरबाजने पुढे सांगितलं.

अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान लवकरच एका पॉडकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डंब बिर्याणी’ असं या पॉडकास्टचं नाव आहे. यामध्ये तो विविध सेलिब्रिटींसोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे. महीप कपूर, भावना पांडे, सीमा खान, नीलम कोठारी सोनी, मलायका अरोरा, सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान आणि ऑरी हे सेलिब्रिटी अरहानच्या पॉडकास्टमध्ये दिसणार आहेत.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.