“मलायकाचा पती, सलमानचा भाऊ म्हटल्याने मला..”; अरबाज खानने व्यक्त केलं दु:ख

मलायकाचा पती म्हणून उल्लेख केल्यावर अरबाजला का वाटायचं वाईट?

मलायकाचा पती, सलमानचा भाऊ म्हटल्याने मला..; अरबाज खानने व्यक्त केलं दु:ख
अरबाज खान, मलायका अरोराImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 10:55 AM

मुंबई- अरबाज खान हा अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. अरबाजने अभिनय क्षेत्रात फारसं यश मिळवलं नसलं तरी दिग्दर्शक म्हणून त्याचं काम चर्चेत राहिलं. मात्र प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या तुलनेत अरबाज आणि सोहैल हे सलमान खानपेक्षा नेहमीच मागे राहिले. अरबाजला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची होती. करिअरच्या एका टप्प्यावर त्याला सलमानचा भाऊ, मलायका अरोराचा पती म्हणून संबोधल्यावर वाईट वाटू लागलं होतं. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाला.

या मुलाखतीत अरबाजने त्याच्या खासगी आयुष्यासोबतच प्रोफेशनल आयुष्याविषयीही मोकळेपणे व्यक्त झाला. सलमान खानचा भाऊ, मलायकाचा पती असे टॅग दिल्याने त्रास व्हायचा, असं तो म्हणाला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “एक वेळ अशी होती जेव्हा मला अशा गोष्टींचं वाईट वाटायचं. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा त्या गोष्टींचा काही अर्थच नव्हता असं जाणवतं. सलीम खानचा मुलगा, सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा पती असा माझा उल्लेख केला जायचा. त्यावेळी मला त्याचं वाईट वाटायचं. मात्र काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. लोकांची मानसिकता बदलण्यात काहीच अर्थ नसतो.”

हे सुद्धा वाचा

“तुम्हाला फक्त संयमी व्हावं लागतं. मी या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्या मला कोणासमोर सिद्ध करायची गरज नाही. लोकांसाठी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची गोष्ट खूप थकवणारी असते. तुम्ही हे कधीपर्यंत करू शकता? किती करू शकता? कोणत्या मर्यादेपर्यंत करू शकता? तुम्ही लोकांना खूश करू शकता का? ज्या दिवशी तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा अधिक महत्त्व द्याल तेव्हा तुम्हाला स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद मिळेल”, असं तो पुढे म्हणाल.

अरबाज सध्या त्याच्या ‘तनाव’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुधीर मिश्रा आणि सचिन कृष्ण यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. ‘फौदा’ या लोकप्रिय इस्रायली वेब सीरिजचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अरबाजने कमांडरची भूमिका साकारली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.