अरबाज-शुराची भेट नेमकी कधी झाली? लग्नाच्या 3 महिन्यांनंतर अभिनेत्याने सांगितलं सत्य

अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. 24 डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला होता. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे.

अरबाज-शुराची भेट नेमकी कधी झाली? लग्नाच्या 3 महिन्यांनंतर अभिनेत्याने सांगितलं सत्य
Arbaaz Khan and Shura KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 10:34 AM

मुंबई : 14 मार्च 2024 | अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर अरबाज आणि शुरा अनेकदा पापाराझींसमोर दिसले. कधी लंच डेट, तर कधी एअरपोर्टवरील या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्नाआधी शुराला डेट करताना अरबाजने कमालीची गुप्तता पाळली होती. आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर अरबाजने त्याची प्रेमकहाणी सांगितली. निकाहच्या आधी काही वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यावेळी पापाराझींची नजर चुकवत कशाप्रकारे डेट केलं, याविषयीही अरबाजने खुलासा केला. शुरा खान ही अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे सेटवर या दोघांची नजरानजर होतच असे. पण प्रेमाची कळी कधी आणि कशी उमलली, ते अरबाजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “लोकांना याबद्दल आश्चर्य वाटू शकतं, पण लग्नापूर्वी आम्ही वर्षभरापेक्षा अधिक काळ एकमेकांना डेट केलंय. आम्ही आमच्या नात्याबद्दल ठाम होतो. आम्ही दोघं खूप नशीबवान होतो. आम्ही बाहेर कॉफी शॉपवर भेटायचो आणि जेव्हा मी तिला घरी घ्यायला किंवा सोडायचो जायचो, तेव्हा आम्हाला कोणीच पाहायचे नाही. कोणतेच पापाराझी तिचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करत नसल्याचा तिला खूप आनंद होता. आता आम्ही कॉफी शॉपवर जाण्याआधीच तिथे पापाराझी पोहोचलेले असतात.”

हे सुद्धा वाचा

अरबाजने या मुलाखतीत शुरासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही खुलासा केला. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. “ती 7-8 वर्षांपासून रवीन टंडनसोबत काम करतेय. सेटवर कधी नजरानजर झाली तर ती तिचं काम करत असायची आणि मी माझं. आम्ही फक्त एकमेकांना हाय-हॅलो इतकंच म्हणायचो. चित्रपटाच्या शूटिंगनंतर आम्ही काही मीटिंग आणि रॅप अप पार्टीदरम्यान भेटलो. तेव्हा आमच्यात काही गप्पा झाल्या आणि त्यानंतर आम्ही बाहेर भेटू लागलो.”

प्रपोजलच्या चार दिवसांनी लग्न

अरबाज खानने 19 डिसेंबर रोजी शुराला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याच्या ठीक चार दिवसांनंतर दोघांनी 24 डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत निकाह केला. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा निकाह पार पडला होता. शुराच्या आधी अरबाजने अभिनेत्री मलायका अरोराशी 1998 मध्ये लग्न केलं होतं. मात्र 2017 मध्ये दोघं विभक्त झाले. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...