रितेश सरांनी तिला सांगूनही..; अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली, स्पष्टच म्हणाली ‘मी तुला कधीच..’

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा असते. निक्की आणि अरबाज यांच्यातील जवळीक पाहून सूत्रसंचालक रितेश देशमुखनेही त्यांना सुनावलं होतं.

रितेश सरांनी तिला सांगूनही..; अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली, स्पष्टच म्हणाली 'मी तुला कधीच..'
अरबाज पटेल, लिझा बिंद्रा आणि निक्की तांबोळीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 3:21 PM

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून अरबाज पटेल सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात त्याची आणि निक्की तांबोळीची जवळीक पाहून सुरुवातीला सूत्रसंचालक रितेश देशमुखने त्याला सुनावलं होतं. यानंतर काही दिवसांनी बिग बॉसच्या घराबाहेर असलेली अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने त्याच्यासोबत ब्रेकअपचा इशारा दिला होता. आता सोशल मीडियावर तिने काही पोस्ट लिहिले असून त्यात तिने निक्की तांबोळीला चांगलंच सुनावलं आहे. त्याचप्रमाणे अरबाजसोबतच्या नात्याची तिने जाहीरपणे कबुली दिली आहे. लिझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तीन वेगवेगळे पोस्ट लिहिले आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने अरबाजची साथ देणार असल्याचं म्हटलंय, तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती निक्कीवर भडकली आहे. तिसऱ्या पोस्टमध्ये लिझाने अरबाजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलंय.

लिझा बिंद्राची पोस्ट-

यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. तुला मी कधीच एकटं सोडणार नाही.’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने निक्की तांबोळीवर निशाणा साधला आहे. ‘मी अरबाजच्या आईला त्याच्यासाठी प्रार्थना करताना पाहिलंय. तो शोमध्ये फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. तो चुकीचा नाही. तो चुकीचा तेव्हा असता जेव्हा त्या मुलीला माहित नसतं की तो माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोन वेळा रितेश सरांनीसुद्धा तिला सांगितलंय. तरीसुद्धा..’, अशी टीका तिने निक्कीवर केली आहे. लिझाने तिसऱ्या पोस्टमध्ये अरबाजसोबतच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. ‘खेळ कोणाचंच नातं मोडू शकत नाही. होय, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी कधीच त्याच्यासोबत ब्रेकअप करणार नाही’, असं तिने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

अरबाज हा याआधी स्प्लिट्सविला एक्स 5 या शोमध्येही झळकला होता. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्यात जवळीक पहायला मिळाली. एका एपिसोडमध्ये जेव्हा बिग बॉसने जाहीर केलं होतं की निक्की आणि अभिजीत जोडी म्हणून एकत्र टास्क करतील, तेव्हा अरबाजने रागाच्या भरात जमिनीवर खुर्ची आपटली होती. त्याचा हा राग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.