Bigg Boss 16: चादर खेचली, बेडवरून खाली पाडलं.. अर्चना गौतमला अशी वागणूक का दिली जातेय?

अर्चनाविरुद्ध बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा हंगामा; सलमान कोणता निर्णय घेणार?

Bigg Boss 16: चादर खेचली, बेडवरून खाली पाडलं.. अर्चना गौतमला अशी वागणूक का दिली जातेय?
Archana GautamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:00 AM

मुंबई: बिग बॉसच्या घरात ‘साऊथची सनी लिओनी’ अर्थात अर्चना गौतमने चांगलाच गोंधळ घातला आहे. शिव ठाकरेवर हात उचलल्याने अर्चनाला शोमधून काढून टाकण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा तिला घरात आणल्यानंतर ती जबरदस्त फॉर्ममध्ये आली आहे. शोमध्ये परत आल्यापासून अर्चनाने प्रत्येकाच्या नाकीनऊ आणलं आहे. साजिद खानची कॅप्टन्सी आणखी कठीण करण्यासाठी अर्चना हरएक प्रयत्न करतेय. मात्र अर्चनाला हा गेम तिच्यावरच भारी पडणार असल्याचं दिसतंय.

बिग बॉसच्या घरात अर्चनाचा हंगामा

बिग बॉसच्या पुढील एपिसोडमध्ये अर्चनाच्या विरोधात सर्व सदस्य उभे राहणार आहेत. साजिद खानच्या कॅप्टन्सीमध्ये अर्चनाने काम करण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक कामात ती आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतेय. साजिद तिला सतत समजावण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अर्चना तिच्या हट्टीपणावर ठाम आहे. घरातलं कुठलंच काम करणार नाही, असं तिने जाहीर केलंय. शोच्या नव्या प्रोमोमध्ये अर्चनाची ही खेळी तिच्यावरच भारी पडणार असल्याचं दिसून येतंय.

हे सुद्धा वाचा

इतर सदस्य अर्चनाला शिकवणार धडा

अर्चना गौतमची मनमानी या घरात चालणार नाही असा निर्धार बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य करतात. कॅप्टन साजिद खानने अर्चनाला निलंबित केलं आहे. “अर्चनाकडून मला काम करून घ्यायचंय. जर तिने काम केलं नाही तर त्याची शिक्षा तिला मिळाली पाहिजे”, असं साजिद म्हणतो. मात्र अर्चना कोणाचंच ऐकायला तयार नसते.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिव ठाकरे आणि अर्चनाचा याआधीही वाद झाला होता. आता पुन्हा एकदा शिव तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. अर्चनाला अंथरुणातून उठायला तो 20 मिनिटं देतो. त्यानंतरही ती उठत नाही, तेव्हा तो तिची चादर खेचून फेकून देतो. घरातील इतर सदस्य बेड आणि बेडशिट उचलून जेलमध्ये टाकून देतात.

सलमान काय करणार?

अर्चना आणि इतर सदस्यांच्या या भांडणात कोणाचा विजय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळणार आहे. वीकेंड का वार या एपिसोडमध्ये सलमान खान या मुद्द्यावर काय बोलणार, अर्चना गौतमला ओरडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.