प्रसिद्ध अभिनेत्रीवर ‘त्याने’ निर्जन स्थळी केला बलात्काराचा प्रयत्न; त्यानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय
अभिनेत्रीने एक काळ गाजवला... मिळाली प्रचंड लोकप्रियता, पण निर्जन स्थाळी 'त्याने' बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. पण त्यांच्या खासगी आयुष्यात अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे अभिनेत्रींनी थेट बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेत्रीचा बॉलिवूडमध्ये असलेला मोलाचा वाटा चाहते विसरु शकलेले नाहीत. अशाच एका अभिनेत्रीनेपैकी एक म्हणजे अभिनेत्री अर्चना जोगळेकर… अर्चना यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सिनेमाचं शुटिंग करत असताना अर्चना जोगळेकर यांना मोठा धक्का बसला.. सध्या सर्वत्र अर्चना जोगळेकर यांच्यावर आलेल्या वाईट प्रसंगाची चर्चा रंगत आहे.
१९९७ साली जेव्हा अर्चना जोगळेकर उडिया भाषेतील एका सिनेमाचं शुटिंग करत होत्या. तेव्हा एक व्यक्ती सेटवर चाहता म्हणून आला आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.. एवढंच नाही तर, जेव्हा त्या व्यक्तीने अर्चना यांना निर्जन स्थाळी पाहिलं तेव्हा देखील त्याने अभिनेत्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा अर्चना यांनी स्वतःला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवलं.. पण या घटनेचा अर्चना यांच्या मनावर खोल परिणाम झाला.
रिपोर्टनुसार, अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला त्यावेळी लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर त्याला १८ महिन्यांची शिक्षा देखील झाली. या धक्कादायक घटनेनंतर अर्चना जोगळेकर यांनी इंडस्ट्री आणि झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. आता अर्चना जोगळेकर अमेरिकेत डान्स क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देत आहेत.
शुटिंग दरम्यान घडलेल्या घटनेनंतर अर्चना यांचं पूर्ण आयुष्य बदललं. धक्कादायक घटनेनंतर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. यशाच्या उच्च शिखरावर असताना अर्चना यांनी लग्न केलं आणि अमेरिकेत शिफ्ट झाल्या. त्यानंतर १९९९ साली अर्चना यांनी न्यू जर्सीमध्ये डान्स स्कूलची स्थापना केली. एका मुलाखतीत अर्चना जोगळेकर यांनी खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. पतीसोबत घटस्फोट झाला असून, अर्चना आता मुलासोबत राहतात
अर्चना जोगळेकर यांनी ‘किस्सा शांती का’, ‘कर्णभूमी’ आणि ‘फूलवती’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये देखील अर्चना जोगळेकर यांनी भूमिका साकारली आहे.
आजही चाहते त्यांनी विसरु शकलेले नाहीत.पण त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अनेक सेलिब्रिटींसोबत देखील अर्चना जोगळेकर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.