तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक
मिलिंद सोमणचा फिटनेस पाहून अवाक झालेल्या पंतप्रधानांना 'तू खरंच 55 वर्षांचा आहेस?' असा प्रश्न विचारण्याचा मोह आवरता आला नाही.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फिटनेस आणि आरोग्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी “फिट इंडिया डायलॉग” (“Fit India Dialogue) हा उपक्रम सुरु केला आहे. याचा भाग म्हणून क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) यांच्यासह देशातील फिटनेस आयकॉन्सशी मोदींनी संवाद साधला. यावेळी मिलिंद सोमणचा फिटनेस पाहून अवाक झालेल्या पंतप्रधानांना ‘तू खरंच 55 वर्षांचा आहेस?’ असा प्रश्न विचारण्याचा मोह आवरता आला नाही. (Are You Really That Old? PM Narendra Modi asked Model Milind Soman)
55 व्या वर्षीही मिलिंद सोमणने राखलेल्या फिटनेसमुळे अनेकदा त्याचे चाहते आणि सोशल मीडिया फॉलोअर्स आश्चर्यचकित होत असतात. मिलिंद सोमणशी बातचित करताना मोदी हसून म्हणाले ‘तुम्ही स्वतःचे जे वय सांगता, तुम्ही खरोखर इतक्या वयाचे आहात की दुसरं काही आहे?’
पंतप्रधानांच्या प्रश्नाला उत्तर देताना मिलिंदही हसला ‘बरेच जण मला विचारतात, तुम्ही 55 वर्षांचे आहात? या वयात मी 500 किमी अंतर कसे धावू शकतो, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं. मी त्यांना सांगतो की माझी आई 81 वर्षांची आहे. जेव्हा मी तिच्या वयाचा होईन, तेव्हा मला तिच्यासारखे फिट राहायचे आहे. माझी आई माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे’ असे सांगताना मिलिंदच्या डोळ्यात अभिमान दिसला.
नरेंद्र मोदींनी मिलिंद सोमणचा उल्लेख विनोदाने “मेड इन इंडिया मिलिंद” असा केला. ‘तुमच्या मातोश्री सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओ मला फॉरवर्ड करण्यात आला होता आणि आश्चर्यचकित होऊन मी तो पाच वेळा पाहिला होता’ असा किस्साही मोदींनी यावेळी सांगितला.
मिलिंद सोमण म्हणाला की, जुन्या पिढीला दिवसाला 50 किलोमीटर चालण्याची सवय होती आणि खेड्यातल्या स्त्रियांना अजूनही पाणी आणण्यासारख्या दैनंदिन कामांसाठी हे रोज करावे लागते, पण शहरांमध्ये आपण एका जागी खिळलो आहोत. आपण जितका जास्त वेळ बसतो तितकी आपली ऊर्जा आणि तंदुरुस्ती कमी होते. एखाद्या व्यक्तीने दिवसाला 100 किलोमीटर चालणे हे सामान्य आहे’ असेही तो म्हणाला.
तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक जण घरी काही सोप्या गोष्टी करु शकतो असा सल्लाही त्याने दिला. “व्यायामशाळा आणि मशीन्स आवश्यक नाहीत. आपण घरात 8 बाय 10 फूट जागेतही फिट राहू शकतो. आपल्याला फक्त मानसिक सामर्थ्याची आवश्यकता आहे,” याकडे मिलिंदने लक्ष वेधले. (Are You Really That Old? PM Narendra Modi asked Model Milind Soman)
देशाच्या सर्वोच्च पदावर असताना ताण कसा सांभाळता, या मिलिंद सोमणच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले “जेव्हा आपण कोणत्याही लोभाशिवाय कर्तव्याच्या भावने स्वत:ऐवजी इतरांची सेवा करतो, तेव्हा कोणताही ताण येऊ शकत नाही. उलट आपणास अधिक ऊर्जा मिळते. तसेच हेल्दी स्पर्धा हे तंदुरुस्तीचे लक्षण आहे.” असेही मोदी म्हणाले.
Fitness knows no age, says Prime Minister @narendramodi while interacting with fitness enthusiast @milindrunning. The Prime Minister also praised Milind Soman’s mother Usha Soman, who is also a fitness enthusiast even at the age of 81. @PMOIndia @FitIndiaOff #FitIndiaDialogue pic.twitter.com/u4Na85wuh8
— Rajya Sabha TV (@rajyasabhatv) September 24, 2020
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी (17 सप्टेंबर) शुभेच्छा देताना ‘सुदृढ आरोग्य तसेच चांगले आणि सक्रिय विरोधक मिळोत’ असे मिलिंदने ट्विटरवर लिहिले होते. त्याला उत्तर देताना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभविचारांसाठी मोदींनी त्याचे आभार मानले होते.
Thank you for your birthday wishes and wishful thinking. 🙂 https://t.co/cnit2tfVvD
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2020
हेही पाहा : किलीमंजारो पर्वतावर सेलिब्रेशन, पत्नीला मिलिंद सोमणचं लिप लॉक विश
(Are You Really That Old? PM Narendra Modi asked Model Milind Soman)