मनारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे पुन्हा आमने सामने, हे ठरले वादाचे कारण
बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये मनारा चोप्रा ही सहभागी झालीये. मनाराचे नाव सतत चर्चेत आहे.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठा धमाका सुरू आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठा वाद होताना दिसतोय. यंदाच्या सीजनचा पहिला राशन टास्क नुकताच घरातील सदस्यांना बिग बॉसने दिला. मात्र, नेहमीच्या सीजनप्रमाणे हा टास्क देखील रद्द करण्याची वेळ बिग बॉसच्या निर्मात्यांवर आली. ज्यावेळी बिग बॉस हे घरातील सदस्यांना टास्कबद्दल माहिती सांगतात, त्यावेळी सर्वजण एकमेकांना बोलताना दिसले. इतकेच नाही तर थेट कपडे बदलण्यासाठी देखील काहीजण गेले.
यानंतर बिग बॉसचा पार चांगलाच चढताना दिसला. या राशन टास्कची संचालक बिग बॉसने सना हिला केले. सर्वात अगोदर मनारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे या टास्कसाठी पुढे आल्या. यावेळी सना या टास्कमध्ये मनारा विजेता असल्याचे जाहिर करते. यानंतर बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. घरातील जास्त करून सदस्य हे तिला भांडताना दिसत आहेत.
अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, निल भट्ट या लोकांना सना हिने चुकीचा निर्णय दिल्याचे वाटत आहे. यानंतर यांच्यामध्ये मोठा वाद देखील होताना दिसतोय. शेवटी काही कारणामुळे बिग बॉस हा टास्क रद्द करत असल्याचे सांगताना दिसत आहेत. यानंतर घरातील सर्वच सदस्य हे साॅरी म्हणताना दिसत आहेत.
Contestants ki extra chalaki pad na jaaye unhi pe bhaari. Stay tuned.
Catch the new episode of #BiggBoss17 on #JioCinema and @ColorsTV
Tune-in to the 24 hour LIVE channel, streaming free only on #JioCinema#BB17 #BiggBoss17 #BiggBoss17onJioCinema @BeingSalmanKhan pic.twitter.com/5sfpntG8ff
— JioCinema (@JioCinema) November 1, 2023
बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. निर्मात्यांनी हे सीजन हिट करण्यासाठी कंबर कसल्याची बघायला मिळतंय. आता बिग बॉस घरातील सदस्यांना काय शिक्षा देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसत आहे.
इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने चक्क विकी जैन याला किडा म्हटले आहे. विकी जैन याचे वागणे अंकिता लोखंडे हिला अजिबातच आवडत नसल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये आल्यापासून यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. नेहमीच विकी जैन याच्यासोबत भांडणे झाल्यानंतर अंकिता लोखंडे ही रडताना देखील दिसते.