बापाचं दुसरं लग्न होताच थेट आई मलायका अरोरा हिच्याकडे पोहोचला अरहान आणि…

Malaika Arora : बापाच्या लग्नानंतर आई मलायका अरोरा हिच्या घरी पोहोचला अरहान खान, खुद्द मलायका हिने फोटो केलाय पोस्ट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका आणि तिच्या लेकाची चर्चा... फोटो पाहून म्हणाल...

बापाचं दुसरं लग्न होताच थेट आई मलायका अरोरा हिच्याकडे पोहोचला अरहान आणि...
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 9:05 AM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरा संसार थाटला आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत निकाह केला आहे. दोघांच्या निकाहसाठी अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे निकाहसाठी अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. वडिलांच्या दुसऱ्या निकाहमध्ये अरहान आनंदी दिसत होता. अरहान याने वडील आणि सावत्र आईसोबत डान्स देखील केला. तिघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. पण निकाह संपन्न होताच. अरहान आई मलायका हिच्या घरी पोहोचला..

वडिलांच्या निकाहनंतर आई मलायका हिच्या घरी पोहोचल्यानंतर अरहान याने ख्रिसमस साजरा केला. मलायका हिने खुद्द मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मलयाका हिने फक्त अरहान याचा फोटो नाही तर, ख्रिसमससाठी केलेल्या डेकोरेशन आणि विविध पदार्थांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर खास फोटो पोस्ट करत मलायका हिने कॅप्शनमध्ये सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी मलायका हिला ट्रोल देखील केलं आहे.

मलायका अरोरा – अरबाज खान

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर मलायका हिने मुलाला जन्म देखील दिला. पण दोघांचं नातं फक्त 18 वर्ष टिकलं. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. पण घटस्फोटानतंर देखील मुलासाठी मलायका – अरबाज एकत्र आले. तिघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमध्ये वयाचं अंतर अधिक असल्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आले. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर अरबाज याच्या आयुष्यात जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण दोघांचं ब्रेकअप झालं. अखेर अरबाज खान याने शूरा हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.