‘आधी चांगला माणूस हो’; ईला अरुण यांच्या वक्तव्यानंतर ढसाढसा रडू लागला अरिजीत सिंग

अरिजीत सिंग आणि ईला अरुण यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ईला अरुण यांच्या वक्तव्यानंतर अरिजीत रडताना दिसत आहे. 'फेम गुरूकुल' या शोमधील हा व्हिडीओ आहे. त्यावर आता ईला अरुण यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

'आधी चांगला माणूस हो'; ईला अरुण यांच्या वक्तव्यानंतर ढसाढसा रडू लागला अरिजीत सिंग
Ila Arun and Arijit SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 10:59 AM

मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | पार्श्वगायक अरिजीत सिंगला वेगळ्या कोणत्या ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या अप्रतिम गायकीच्या जोरावर जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अरिजीत सिंगची लोकप्रियता इतकी जास्त आहे की क्वचित एखाद्या चित्रपटात त्याचं गाणं नसेल. आज देशभरात अरिजीत हा सर्वांत लोकप्रिय गायक आहे. मात्र हे स्टारडम आणि ही लोकप्रियता मिळवणं त्याच्यासाठी काही सोपं नव्हतं. यासाठी त्याने कठोर मेहनत केली आहे. प्रसंगी त्याला काहींचा ओरडासुद्धा खावा लागला आहे. एकदा अरिजीतवर प्रसिद्ध गायिका ईला अरुण खूप भडकल्या होत्या. त्यावेळी त्याला खूप रडू कोसळलं होतं. या दोघांचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा अरिजीत सिंग हा ‘फेम गुरूकुल’ या रिअॅलिटी शोचा स्पर्धक होता. हा शो 2005 मध्ये प्रसारित झाला होता. यामधील सर्व स्पर्धक एकाच छताखाली एकत्र राहायचे आणि तिथेच राहत ते आपल्या गुरुकडून प्रशिक्षण घ्यायचे. प्रशिक्षणानंतर हे स्पर्धक परफॉर्म करून दाखवायचे. ‘फेम गुरूकुल’ या शोची ‘हेड मिस्ट्रेस’ ईला अरुण होत्या. या व्हिडीओमध्ये त्या अरिजीत सिंगवर खूप नाराज असल्याचं दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

ईला अरुण या अरिजीतवर एका गोष्टीमुळे इतक्या नाराज झाल्या होत्या, की त्यांनी त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की अरिजीत त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो, “प्लीज मॅम, मला तुमच्या पायांना स्पर्श करू द्या. मी तुमचा खूप आदर करतो.” त्यावर ईला त्याला म्हणतात, “बस, पायांना स्पर्श करण्यालायक मी राहिले नाही. मी तुझ्याशी बोलेन. एखाद्या व्यक्तीच्या पायांना तेव्हाच स्पर्श केला जातो, जेव्हा त्याच्याविषयी मनात खूप आदर असतो.”

पहा व्हिडीओ

ईला अरुण यांचे शब्द ऐकून अरिजीत पुढे म्हणतो, “मॅम, तुम्ही असं का करत आहात? तुम्ही मला पायांना स्पर्श करू देत नाही आहात. तुमच्याशी बोलू देत नाही आहात. जर तुम्ही माझ्याशी असं वागलात तर मी वेडा होईन. मी सर्वांत जास्त तुमचा आदर करतो.” या व्हिडीओत ईला अरुण पुढे त्याला प्रश्न विचारतात, “मला वाईट वाटून घेण्याचा काही अधिकार नाही का? एखादा कलाकार गाणं सुरात गात असेल पण खासगी आयुष्यात तो बेसूर असेल तर मला सहन होत नाही. तुझ्यासाठी नात्यांचं काही महत्त्व आहे की नाही? विचार कर एकदा. जर मी तुझ्यासाठी फक्त एक शिक्षिका आहे का? तुझं आणि माझं खुर्चीशी वेगळा कोणता संबंध होता का? तू असा तर नाहीस की जेव्हा काही साध्य करशील तेव्हा सर्व नात्यांना पणाला लावशील? जावेद भाईने सांगितलं की याच्याशी चांगलं बोला. हा एके दिवशी स्टार बनला तर विचारणारसुद्धा नाही. जर तू चांगला व्यक्ती बनला नाहीस तर कितीही चांगला गायक असला तरी खालीच पडशील.”

ईला अरुण यांचं हे वक्तव्य ऐकून अरिजीतला रडू कोसळतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर ईला अरुण यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, ‘अरे माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय असलेला अरिजीत तेव्हा किती लहान होता आणि आता किती मोठा झाला आहे. आता तर तो विसरलाय. पण तो खूप प्रतिभावान कलाकार आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. फेम गुरूकुल या शोमध्ये मी नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांवर देवाचा कायम आशीर्वाद राहो.’

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.