Arijit Singh: अरिजीत सिंगची प्रकृती खालावली, अनेक कॉन्सर्ट रद्द, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Arijit Singh Health Update: अरिजीत सिंगची प्रकृती खालावली, सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... गायकाला नक्की झालं तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरिजीत सिंग याने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा...
बॉलिवूडचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती खालावल्यामुळे गायकाने ब्रिटेन याठिकाणी होणारा कॉन्सर्ट रद्द केला आहे. गायकाने अनेक कॉन्सर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. अरिदीत याने सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करत प्रकृती स्थिर नसल्याची माहिती दिली आहे. कॉन्सर्ट अचानक रद्द केल्यामुळे अरिजीत याने खंत देखील व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अरिजीत याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
अरिजीत सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत गायकाने कॅप्शनमध्ये ‘महत्त्वपूर्ण अपडेट आणि सूचना…’ असं लिहिलं आहे. ‘सर्व चाहत्यांना एक गोष्ट सांगताना दुःख होत आहे, काही वैद्यकीय परिस्थितींमुळे ऑगस्टमध्ये होणारे सर्व कॉन्सर्ट रद्द करावे लागत आहे. मला माहिती आहे शोसाठी तुम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि कॉन्सर्ट होत नसल्यामुळे मला दुःख होत आहे. तुमचं प्रेम माझी शक्ती आहे.’
View this post on Instagram
अरिजीत याने रद्द झालेल्या कॉन्सर्टच्या तारखा देखील जाहिर केल्या आहेत. 15 सप्टेंबर (लंडन), 16 सप्टेंबर (बर्मिंगहॅम), 19 सप्टेंबर (रॉटरडॅम), 22 सप्टेंबर (मँचेस्टर) तुमच्या समजूतदारपणाबद्दल, संयमासाठी आणि अतूट प्रेमाबद्दल धन्यवाद, असे गायकाने म्हटले आहे.
अरिजीत सिंग याच्या पोस्टवर चाहते कमेंट तर गायकाची विचारपूस करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘तू बॉलिवूडचा ऑक्सिजन आहेस… प्रकृतीची काळजी घे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लवकरच ठिक हो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘काही गोष्टींची प्रतीक्षा केलेली चांगली असते… स्वतःच्या प्रकृतीची काळजी घे…’ अशा प्रकारे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, पोस्टमध्ये अरिजीत सिंग याने प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं आहे. पण गायकाला नक्की काय झालंय कळू शकलेलं नाही. अरिजीत सिंग बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अरिजीत सिंग बॉलिवूडवर राज्य करत आहे. मीडियारिपोर्टनुसार, अरिजीत सिंग याच्याकडे 160 कोटी रुपये आहेत.