मुंबई | 9 मार्च 2024 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रेमळ कपलचा विषय निघाल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचं नाव अव्वल स्थानी असतं. घटस्फोटानंतर मलायकाच्या आयुष्यात अर्जुन याची एन्ट्री झाली. पण दोघांनी कधीच त्यांचं नातं जगापासून लपवून ठेवलं नाही. वयाच्या अंतरामुळे आणि इतर अन्य गोष्टींमुळे मलायका आणि अर्जुन यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण दोघांनी कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.
मलायका आणि अर्जुन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अर्जुन गर्लफ्रेंड मलायका हिला तिच्या घरी सोडण्यासाठी तिच्या घरपर्यंत आला.
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ कमेंट करत चाहते अर्जुन याला ‘परफेक्ट बॉयफ्रेंड…’ असं म्हणत आहेत. चाहत्यांना मलायका आणि अर्जुन यांच्यातील केमिस्ट्री प्रचंड आवडते.
मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या सहा वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं समोर आलं. त्यानंतर मलायका – अर्जुन यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं.
सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील दोघांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. मलायका आणि अर्जुन देखील एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुनची एन्ट्री झाली. तर दुसरीकडे अरबाज याने देखील वयाच्या 56 व्या वर्षी 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाजच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. अरबाज – शुरा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.