मलायका अरोरा – अर्जुन कपूर करणार लग्न? अभिनेत्याकडून मोठा खुलासा
Arjun Kapoor : मलायका अरोरा - अर्जुन कपूर नात्याला देणार पती - पत्नीचं नाव? अभिनेत्याने अखेर सोडलं मौन..., अर्जुन कपूरसोबतच्या नात्याचं भविष्य काय? अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका अरोरा - अर्जुन कपूर होणार पती - पत्नी?
मुंबई | 14 डिसेंबर 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा घटस्फोटानंतर अभिनेत्री अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका – अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील दोघे कायम एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशात मलायका आणि अर्जुन लग्न करणार का? नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात मलायका – अर्जुन याने लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, रिलेशलनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दोघांमध्ये असलेलं वयाचं अंतर आणि इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अशात अभिनेत्याने ‘कॉफी विथ करण’ शोच्या माध्यमातून ट्रेलर्सना सुनावलं आहे.
शोमध्ये करण याने अर्जुन याला ऑनलाईन ट्रोलिंग आणि वयातील अंतरामुळे मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर फरक पडतो का? यावर अभिनेता म्हणाला, ‘असं कोणताच व्यक्ती नाही, ज्या फरक पडणार नाही…’
‘समोर येणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही कसा सामना करता यावर सर्वकाही अवलंबून आहे. जेव्हा लोकं सोशल मीडियावर कमेंट करतात तेव्हा त्यांचे संस्कार दिसून येतात. लोकांना फक्त आमच्याकडून अटेंशन हवं असतं…प्रत्येक ट्रोलिंगला सडेतोड उत्तर द्यावं असं मला वाटायचं… पण आता काहीही फरक पडत नाही. ‘ एवढंच नाही तर, मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील अर्जुन याने मोठं वक्तव्य केलं आहे.
मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्याला पती – पत्नीचं नाव देणार का? असा प्रश्न देखील करण याने अभिनेत्याला विचारला. यावर अर्जुन म्हणाला, ‘मी आज ज्या ठिकाणी आहे, तेथे आनंदी आहे. आम्ही प्रत्येक संकटाचा सामना एकत्र केला आहे. त्यामुळे मलायका याठिकाणी नसताना मी आमच्या नात्याबद्दल काहीही बोलणार नाही.’ असं अभिनेता म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.