मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगत आहेत. रंगणाऱ्या चर्चांदरम्यान अर्जुन याने मलायाका हिच्या सोशल मीडियावर पोस्ट कमेंट केली. एवढंच नाही तर दोघांचा एकत्र व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यावर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या आयुष्यात घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. पण ब्रेकअपच्या चर्चांनंतर अर्जुन याचं नाव दुसऱ्या महिलेसोबत जोडलं जात आहे.
ज्या महिलेसोबत अर्जुन याच्या नावाची चर्चा रंगत आहे, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे कुशा कपिला हिचं देखील घटस्फोट झालं आहे.. असं समोर येत आहे..
अर्जुन याचं नाव मलायका आणि कुशा यांच्या आधी पाच सेलिब्रिटी महिलांसोबत जोडण्यात आलं आहे. ज्यामध्ये दोघी प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या पत्नी असून एक माजी खासदार यांची होणारी पत्नी आहे. तर आज जाणून घेवू अर्जुन कपूर याच्या एक्स – गर्लफ्रेंड्सबद्दल
अर्जुन कपूर – अर्पिता खान | अर्पिता अभिनेता सलमान खान याची बहीण आहे. अप्रिता हिला देखील अर्जुन कपूर याने डेट केलं आहे. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत देखील अर्जुन याच्या नावाची चर्चा रंगली होती. पण अर्जुन याने कायम परिणीती हिचा उल्लेख एक चांगली मैत्रीण म्हणून केला. आता परिणीती लवकरच माजी खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
अथिया शेट्टी आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत देखील अर्जुन याच्या नावाची चर्चा रंगली होती. पण अभिनेत्याचं दोघींसोबत असलेल्या नात्याचं सत्य समोर आलं नाही. अथिया शेट्टी क्रिकेटपटू केएल राहुल याची पत्नी आहे, तर अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी आहे
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत देखील अर्जुन याच्या नावाची चर्चा रंगली होती. काही वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र अर्जुन कपूर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.