malaika arora हिला डेट करण्याआधी खान कुटुंबाच्या ‘या’ लेकीसोबत होते अर्जुनचे प्रेमसंबंध

खान कुटुंबाची पहिली सून मलायाका आरोरा हिलाच नाही तर, लेकीला देखील अर्जुन कपूर याने केलय डेट.. सलमान खान देखील 'ही' गोष्ट माहिती होती पण...

malaika arora हिला डेट करण्याआधी खान कुटुंबाच्या 'या' लेकीसोबत होते अर्जुनचे प्रेमसंबंध
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 1:00 PM

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अर्जुन कपूर सध्या अभिनेत्री मलायका आरोरा हिला डेट करत आहे. पण मलायका हिच्यासोबत नावाची चर्चा रंगण्याआधी अभिनेता खान कुटुंबाच्या एका मुलीला डेट करत होता. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता खान हिच्यासोबत अर्जुनच्या नावाची तुफान चर्चा रंगली. पण दोन वर्षांनंतर अर्पिता आणि अर्जुन यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज अर्जुन आणि अर्पिता यांच्या लव्हस्टोरी बद्दल काही गोष्टी जाणून घेवू…

अर्जुन आणि अर्पिता यांच्या नात्याची सुरुवात झाली, तेव्हा अभिनेता अभिनयापासून दूर होता. जेव्हा दोघांच्या नात्याची सुरुवात झाली, तेव्हा अर्जुन फक्त १८ वर्षांचा होता. एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला, ‘ते माझ्या आयुष्यातील एक असं रिलेशनशिप होतं, ज्यामध्ये मी प्रचंड गंभीर होतो. तिच्यासोबत मी भविष्याचे स्वप्न देखील पाहिले होते. जेव्हा आमच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. आमचं नातं फक्त दोन वर्ष टिकलं…’

हे सुद्धा वाचा

अर्पितासोबत असलेल्या नात्याची माहिती खुद्द अर्जुनने सलमान खान याला दिली होती. अर्जुन आणि अर्पिता यांच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर सलमान देखील थक्क झाला. ‘मैंने प्यार क्यों किया’सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सलमान आणि अर्जुन यांची देखील मैत्री झाली होती. सलमानला देखील बहिणीसोबत असलेलं अर्जुनचं नातं मान्य होतं. पण बॉलिवूडमध्ये अर्जुन स्वतःची ओळख निर्माण करत होता, तेव्हा अर्पिताने अर्जुनसोबत ब्रेकअप केलं.

अर्जुन कपूर जेव्हा निखिल आडवाणी यांच्या ‘सलाम-ए-इश्क’ सिनेमात काम करत होता, तेव्हाचं अर्पिताने अर्जुनसोबत ब्रेकअप केलं. पण दोघांचं ब्रेकअप नक्की कोणत्या कारणामुळे झालं, हे दोघांनी देखील सांगितलं नाही. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी सलमान खान याने अर्जुनची मदत केली.

अखेर अर्पितापासून विभक्त झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले. काही वर्षांनंतर अर्जुनने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ब्रेकअपनंतर अर्पिताने २०१४ मध्ये आयुष शर्मा याच्यासोबत लग्न केलं. आयुष आणि आर्पिता यांना दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे अर्जुन खान कुटुंबाची पहिली सून आणि अरबाज खानची पहिली पत्नी मलायका आरोरा हिला डेट करत आहे.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.