कोलकाता डॉक्टर प्रकरणानंतर अर्जुन कपूरचा पुरुषांना खास संदेश; रक्षाबंधननिमित्त म्हणाला..

बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करण्यापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने देशातील पुरुषांना खास संदेश दिला आहे. अर्जुनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोलकाता डॉक्टर प्रकरणानंतर अर्जुन कपूरचा पुरुषांना खास संदेश; रक्षाबंधननिमित्त म्हणाला..
Arjun KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 11:40 AM

कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात तीव्र संताप आहे. विविध क्षेत्रातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. अशातच रक्षाबंधनच्या निमित्ताने अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रक्षाबंधन आणि महिलांची सुरक्षा याविषयी बोलतान दिसतोय. अर्जुनने या व्हिडीओच्या माध्यमातून देशातील पुरुषांसाठी एक खास संदेश दिला आहे. “महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहण्यासोबतच त्यांना सुरक्षित वाटावं असं वातावरण कसं निर्माण करता येईल, याचा विचार पुरुषांनी करावा”, असं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला अर्जुन कपूर?

“मी माझ्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा करायला जात आहे. पण देशात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून हा सण साजरा करताना खूप विचित्र वाटतंय. एकमेकांची रक्षा करण्याचा, तुमच्या बहिणींची रक्षा करण्याचा, तुम्ही ज्या महिलेवर प्रेम करता, जिची काळजी घेता, तिच्या पाठिशी उभं राहण्याचा हा सण आहे. पण पुरुषांमध्ये सर्वसामान्य समज आणि शिक्षणाची कमतरता दिसून येत आहे. रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीची रक्षा करणं हे आपल्याला शिकवलं जातं. पण बहिणींसाठी किंवा महिलांसाठी इतकं सुरक्षित वातावरण निर्माण करा की त्यांना सुरक्षेसाठी भावाची गरज भासली नाही पाहिजे, हे आपण का शिकवत नाही? भाऊ किंवा पुरुष एका महिलेचं रक्षण करतो, असंच आपल्या मनावर बिंबवलं गेलंय. पण पुरुषांना हे शिकवण्याची गरज आहे की त्यांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं”, असं त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

याविषयी तो पुढे म्हणाला, “हा विषय खूप मोठा आहे. कारण सर्वसामान्य शिक्षण आणि समज यांचीच कमतरता आहे. लोक याबद्दल किती विचार करतील किंवा कितपत बदलतील हे मला माहीत नाही. पण नेहमी आपल्याला त्यांचं रक्षण करायला का सांगतात, त्यांना सुरक्षित वाटावं असं राहायला का सांगत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात कायम घोळतोय. एक भाऊ आणि एक पुरुष म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातील स्त्रियांना जाणण्याचा, समजण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. पुरुषांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी तत्पर राहण्यासोबतच त्यांना सुरक्षित कसं वावरता येईल, याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हीच मोठी शिकवण असेल. ”

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी करत राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शिकाऊ डॉक्टर, आंतर्वासित डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर शनिवारपासून निदर्शनं करत आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.