Valentines Day 2023 : अर्जुन कपूर याने खास अंदाजात मलायकाला दिल्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा व्हॅलेंटाईन डे... अभिनेता एक खास फोटो शेअर करत म्हणाला...; अर्जुन आणि मलायका यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटोची सर्वत्र चर्चा
Valentines Day 2023 : अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. चाहत्यांना देखील दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका – अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोघांनी फक्त आणि फक्त त्यांच्या भवनांना आणि प्रेमाला महत्त्व दिलं. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ दोघांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. नेहमीप्रमाणे व्हॅलेंटाईन डेचं निमित्तसाधत अर्जुन याने गर्लफ्रेंड मलायका हिला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत अर्जुन याने मलायका हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. ( arjun kapoor malaika marriage)
अर्जुन कपुर याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन याने मलायकाचा हात धरत सुंदर पोज दिली आहे. फोटोमध्ये दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहेत. मलायकासोबत फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये बदामाच्या आकाराचा इमोजी पोस्ट केला आहे. अर्जुनची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अर्जुनच्या पोस्टवर मलायकाने देखील कमेंट केली आहे. सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुनच्या फोटोची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील मलायका – अर्जुन यांच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील मलायका – अर्जुन कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसतात. शिवाय दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक मुलाखतींमध्ये देखील दोघे त्यांच्या नात्याबद्दल स्पष्ट बोलताना दिसतात. शिवाय मलायका – अर्जुन कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात.
अर्जुन कपूरचे आगामी सिनेमे… नुकताच अर्जुन कपूर ‘कुत्ते’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन करू शकला नाही. आता अर्जुन अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द रूल’ सिनेमात दिसणार आहे. पण सिनेमा निर्मात्यांही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अर्जुन आणि मलायका कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अर्जुन आणि मलायका कायम फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रावर पोस्ट करत असतात.