आनंदी आहे…, मलायका सोबत ब्रेकअपच्या चर्चा, अर्जुन कपूरने शेअर केली अशी पोस्ट
Malaika Arora and Arjun Kapoor | मलायका अरोरा - अर्जुन कपूर 5 वर्षांनंतर विभक्त झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मलायका हिच्यानंतर अर्जुन याने देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका - अर्जुन यांच्या नात्याची चर्चा...
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री मलायका अरोरा – अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी सूत्रांनी मलायका – अर्जुन यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता मलायकाच्या माजी मॅनेजरने दोघांच्या नात्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. मलायका – अर्जुन यांचं ब्रेकअप झालेलं नाही. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत…ज्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं नाही… अशी देखील चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मलायका हिच्यासोबत ब्रेकअपची चर्चा रंगत असताना अर्जुन याने पोस्ट सोशल मीडीयावर शेअर केली आहे. अर्जुन याने पोस्ट मलायका हिच्यासाठी नाहीतर, सावत्र बहीण जान्हवी कपूर हिच्यासाठी शेअर केली आहे. जान्हवी ‘मिस्टर ऍन्ड मिसेस माही’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.
बहिणीला शुभेच्छा देत अर्जुन म्हणला, ‘सिनेमा हीट झाल्यामुळे आनंदी आहे…’, शिवाय अर्जुन कपूर याने काका अनिल कपूर यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोचं होस्ट करताना दिसरणार आहेत. सध्या सर्वत्र अर्जुन कपूर याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर मलायका हिने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘जमीनीवरील सर्वांत मोठं धन ती लोकं आहेत, जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्यासोबत कायम उभे असतात. अशा लोकांना विकतही घेता येत नाही आणि त्यांची जागा देखील कोणी घेऊ शकत नाही… आपल्या सर्वांकडे अशी लोकं फार कमी असतात….’ अभिनेत्रीची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.
मलायका हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी अर्जुन यांच्या नावाची चर्चा अनेक अभिनेत्रींसोबत झाली. एवढंच नाहीतर, अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत देखील अर्जुन याचं अफेअर होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अर्जुन त्याच्या सिनेमांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो.
मलायका आणि अर्जुन यांनी 2019 मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. मलायका – अर्जुन यांच्या वयात असलेल्या अंतरामुळे देखील दोघांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं. पण तेव्हा कोणालाच अधिक महत्त्व न देता दोघांनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.