Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल, 22 डिसेंबरच्या चौकशीपूर्वीच समन्स का बजावला?
ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड सेलिब्रिटींन विरोधात आपली मोहिम सुरू केली आहे.
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड सेलिब्रिटींन विरोधात आपली मोहिम सुरू केली आहे. ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल पुन्हा एकदा मुंबईतील एनसीबी कार्यालयात पोहोचला आहे. खरतर अर्जुन रामपालला चौकशीसाठी 22 डिसेंबरला एनसीबीने बोलावले होते. दरम्यान, अर्जुन रामपाल देश सोडून विदेशात गेला असल्याच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. (Arjun Rampal reached the NCB office)
अर्जुन रामपाल आज 21 डिसेंबरला एनसीबी कार्यालयात गेला आहे. मात्र, 22 डिसेंबरला एनसीबीने त्याला समन्स बजावला असताना आजच तो कसा काय एनसीबी कार्यालयात गेला यावर आता चर्चा होत आहे.
9 नोव्हेंबरला अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते.
ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव
या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दक्षिण अफ्रिकेचा नागरिक असलेला अॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
बॉलिवूडमध्ये ड्रग्जची पाळेमुळे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!
(Arjun Rampal reached the NCB office)