First Look | ‘धाकड’मध्ये अर्जुन रामपालचा कंगणाशी पंगा, जबरदस्त लूक आला समोर!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

First Look | 'धाकड'मध्ये अर्जुन रामपालचा कंगणाशी पंगा, जबरदस्त लूक आला समोर!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 3:35 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच कंगनाने तिचा फर्स्ट लूक शेअर करताना चित्रपटाची तारीख देखील जाहीर केली होती. या चित्रपटात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्याने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अर्जुन रफ आणि टफ लूकमध्ये दिसत आहे. (Arjun Rampal shared a poster of Dhaakad movie)

हे पोस्टर शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिले की बूम, बुराइचे दुसरे नाव आहे रुद्रवीर, धाकड चित्रपट ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. पोस्टरमध्ये अर्जुनच्या हातात बंदूक  दिसत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत होते. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, ‘ निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.

कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.

संबंधित बातम्या :

Sexual harassment : शर्लिन चोप्राकडून लैंगिक शोषणाचा आरोप; साजिद खानच्या अडचणीत पुन्हा वाढ

Adipurush | सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!

अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!

(Arjun Rampal shared a poster of Dhaakad movie)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.